ईमेल हॅक करून कंपनीचे ५० लाख गायब

फिर्यादीच्या फोर्ब्स मार्शल या कंपनीकडून जर्मनी येथील डायकॉम कंपनीला परकीय चलन ५६ हजार ४५०  युरो (भारतीय चलनात ५० लाख २७ हजार ४३७ रुपये) ईमेलद्वारे संपर्क करून पाठवण्यात आले. दरम्यान अज्ञातांनी जर्मनी येथील डायकॉम कंपनीचा ईमेल हॅक केला आणि फोर्ब्स मार्शल या कंपनीकडून पाठवण्यात आलेले ५० लाख २७ हजार ४३७ रुपये अल्स्टर बँक आयर्लंड या बँकेच्या एका खात्यावर परस्पर ट्रान्सफर केले.

पिंपरी : ईमेल हॅक करून एका नामांकित कंपनीची ५० लाखांहून अधिक रक्कम ट्रान्सफर केल्याची घटना समोर आली आहे. चिंचवड येथील फोर्ब्स मार्शल कंपनीतून जर्मनी येथील एका कंपनीला ई मेलद्वारे पाठवण्यात आलेले ५० लाख २७ हजार ४३७ रुपये अज्ञातांनी ईमेल हॅक करून एका बँक खात्यात ट्रान्सफर केले. याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेमंत गणेश झेंडे (वय ५७, रा. तळेगाव दाभाडे) यांनी याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत फसवणुकीसह माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलीस प्रकरणाचा तपास करीत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीच्या फोर्ब्स मार्शल या कंपनीकडून जर्मनी येथील डायकॉम कंपनीला परकीय चलन ५६ हजार ४५०  युरो (भारतीय चलनात ५० लाख २७ हजार ४३७ रुपये) ईमेलद्वारे संपर्क करून पाठवण्यात आले.

दरम्यान अज्ञातांनी जर्मनी येथील डायकॉम कंपनीचा ईमेल हॅक केला आणि फोर्ब्स मार्शल या कंपनीकडून पाठवण्यात आलेले ५० लाख २७ हजार ४३७ रुपये अल्स्टर बँक आयर्लंड या बँकेच्या एका खात्यावर परस्पर ट्रान्सफर केले.