Daund: Police arrest three for robbing 19 lakh cash by throwing chilli powder in trader's eye

पिंपरी-चिंचवड मधून तडीपार असलेल्या गुंडाने चार साथीदारांसह दौंड मधील व्यापार्‍याचे 19 लाख रुपये लुटले होते.दौंड पोलिसांनी तडीपार गुंडाला बारा तासाच्या आत केले जेरबंद. दौंड शहरातील दुकान बंद करून रात्री घराकडे परतत असलेल्या किराणा दुकानाच्या वयोवृद्ध व्यापाऱ्याच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून 19 लाखांची रोकड लुटणा-या टोळीतील तिघांना दौंड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत(Daund: Police arrest three for robbing 19 lakh cash by throwing chilli powder in trader's eye).

    पुणे : पिंपरी-चिंचवड मधून तडीपार असलेल्या गुंडाने चार साथीदारांसह दौंड मधील व्यापार्‍याचे १९ लाख रुपये लुटले होते.दौंड पोलिसांनी तडीपार गुंडाला बारा तासाच्या आत केले जेरबंद. दौंड शहरातील दुकान बंद करून रात्री घराकडे परतत असलेल्या किराणा दुकानाच्या वयोवृद्ध व्यापाऱ्याच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून १९ लाखांची रोकड लुटणा-या टोळीतील तिघांना दौंड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत(Daund: Police arrest three for robbing 19 lakh cash by throwing chilli powder in trader’s eye).

    यातील एक आरोपी पिंपरी-चिंचवड आणि परिसरातून तडीपार आहे तर एका अल्पवयीन मुलाचा देखील यात समावेश आहे. आरोपींकडून ६ लाख ५२ हजाराची रोकड पोलिसांनी हस्तगत केली आहे. यातील कमल हिरमटकर हा पिंपरी चिंचवड मधून तडीपार असून तो सध्या दौंड मध्ये येऊन राहत होता

    तसेच आकाश आरमुघम पिल्ले वय -३१ राहणार गांधीनगर देहूरोड ता.वडगाव मावळ जि.पुणे, प्रदीप उर्फ गणेश महेश कोळी वय- १९ रा.तेलगू कॉलनी,संभाजी नगर दौंड यांना अटक करण्यात आली आहे. यातील तिघांही आरोपींना पाच दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे.अशी माहिती पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी दिली.