दौंड हादरले! लॅाजवर नेवून विवाहीत महिलेवर बलात्कार ; कुरकुंभ येथील धक्कादायक घटना, एका महिलेसह दोघांवर गुन्हा दाखल

गाडी मधील नराधमांनी ओरडा ओरड करायचा नाही जर केला तर तुला जिवंत ठेवणार नाही, असा दम देवून या महिलेवर अत्याचार केला. याबाबत पिडीत महिलेलेन दौंड पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्याने दौंड पोलीसांनी एका महिलेसह दोन जणांवर बलात्कारचा गुन्हा दाखल केला आहे.

    पाटस :दौंड तालुक्यातील कुरकुंभ येथील पुणे सोलापुर राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या एका लॉजवर नेऊन एका महिलेलावर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. याघटनेने दौंड तालुका हादरला आहे. याघटनेते धक्कादायक बाब अशी ही याप्रकणात एका महिलेचाही समावेश आहे. दौंड पोलिसांनी एका महिलेसह तीन जणांवर गुन्हा दाखल केला आहे.अशी माहिती दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी दिली.

    विशाल रोहिदास चौधरी (वय ३२ रा. मटकळापवार वस्ती खुटबाव ता.दौंड) व देविदास केरबा पवार( वय ४०, रा.नाथाचीवाडी,ता.दौंड ) आणि रज्जया सय्यद (पुर्ण नाव माहित नाही. रा.खोर,ता.दौंड.जि.पुणे ) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेली माहिती असी की, बुधवारी (दि. २४ ) ४० वर्षीय आरोपी महिलेने अत्यारीत पीडित महिलेला बचत गटाचे काम आहे असे सांगून आरोपींनी पीडित महिलेला मारुती ( क्रमांक एम, एच , १२ पी. एच. १७२७ ) या गाडीमध्ये कुरकुंभ येथील महाराजा लॉजवर घेऊन गेले. यावेळी पीडीत महिलेने तु मला येथे कोठे आणले आहे, मी माझे नव-याला सांगते असे म्हणाली असता आरोपी महिलेने पिडीत महिलेला शांत बस असे म्हणून लॉज मधील एका रूम मध्ये घेवून जावून फिर्यादीस हाताने तोंडावर मारहाण करून येथून कोठे ही जायचे नाही गप्प बसून राहा असे म्हणून ती तेथून निघून गेली.

    गाडी मधील नराधमांनी ओरडा ओरड करायचा नाही जर केला तर तुला जिवंत ठेवणार नाही, असा दम देवून या महिलेवर अत्याचार केला. याबाबत पिडीत महिलेलेन दौंड पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्याने दौंड पोलीसांनी एका महिलेसह दोन जणांवर बलात्कारचा गुन्हा दाखल केला आहे.