रद्द झालेले ओबीसी आरक्षण अबाधित ठेवण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहरात २४ ला आंदोलनाचा निर्णय

सर्वोच्च न्यायालयाने एका रिट पिटिशन मध्ये दिलेल्या निकालामुळे, संपूर्ण देशातील तसेच महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्स्थांमधिल ओबीसींचे राजकिय आरक्षण धोक्यात आले आहे, या निर्णयाचे दुरगामी परिणाम होत आहे. संपूर्ण राज्यात ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपंचायत, नगरपालिका व महानगरपालिकांमधील ओबीसींसाठी राखीव असलेल्या जवळपास ५६ हजार जागांवर याचा परिणाम होत आहे.

    पिंपरी: रद्द झालेले ओबीसी आरक्षण अबाधित ठेवण्यासाठी, पिंपरी-चिंचवड शहरात येत्या २४ जून रोजी आंदोलनाचा निर्णय पिंपरी येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला. आज झालेल्या या बैठकीत महात्मा फुले समता परिषद, बारा बलुतेदार महासंघ, ओबीसी संघर्ष समिती, वंचित बहुजन आघाडी, जय भगवान महासंघ, माळी महासंघ, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, आणि सर्व राजकीय पक्षांचे आजी-माजी नगरसेवक, आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

    सर्वोच्च न्यायालयाने एका रिट पिटिशन मध्ये दिलेल्या निकालामुळे, संपूर्ण देशातील तसेच महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्स्थांमधिल ओबीसींचे राजकिय आरक्षण धोक्यात आले आहे, या निर्णयाचे दुरगामी परिणाम होत आहे. संपूर्ण राज्यात ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपंचायत, नगरपालिका व महानगरपालिकांमधील ओबीसींसाठी राखीव असलेल्या जवळपास ५६ हजार जागांवर याचा परिणाम होत आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यात ओबीसीं समजामध्ये असंतोष पसरला आहे. मंडल आयोग व ७३ आणि ७४ व्या घटना दुरूस्तीने ओबीसींना विविध पातळींवर आरक्षण दिले आहे. त्यामुळे ओबीसींचे आरक्षण कायदेशीर असून त्याचे संरक्षण होणे गरजेचे आहे. ओबीसी प्रवर्गातील वंचित जनसमुहांना लोकशाही प्रक्रियेत पंचायतराज संस्थांमध्ये पर्याप्त प्रतिनिधित्व मिळणे गरजेचे आहे.

    सध्या उद्भवलेल्या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी सरकारने त्वरीत उचित कार्यवाही करून, ओबीसींच्या हक्काच्या २७ टक्के आरक्षणाचे रक्षण करावे या मागणीसाठी पिंपरी-चिंचवड शहरात आंदोलन करण्यात येणार आहे. सदर बैठकीमध्ये माजी स्थायी समिती अध्यक्ष संतोष लोंढे, माजी नगरसेवक सतिश दरेकर, काळुराम गायकवाड, आनंदा कुदळे, अॅड चंद्रशेखर भुजबळ, विजय लोखंडे, प्रताप गुरव , सुरेश गायकवाड ,नेहुल कुदळे, हिरामण भुजबळ ,गणेश ढाकणे वंदना जाधव ,अॅड.सौ.विद्या शिंदे, सौ कविता खराडे , शंकर लोंढे , ईश्वर कुदळे, विजय दर्शले, शिवदास महाजन,संतोष जोगदंड,सदानंद माने, पि.के .महाजन, रमेश सोनवणे सदानंद माने ,हनुमंत लोंढे ,संतोष गोतावळे,मधुकर सिनलकर ,नकुल महाजन, कैलास भागवत ,कैलास सानप आदी मान्यवर उपस्थित होते.