प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

छोट्या मृत पाळीव प्राण्यांच्या दहनासाठी प्राणी दहन मशीनद्वारे त्यांच्या मालकांकडून महापालिका दहनशुल्क घेणार आहे. यासाठी एक हजार रुपये शुल्क आकारण्याचे स्थायी समितीने निश्चित केले असून त्यास मंजूरी दिली. या विषयाच्या अंतिम मान्यतेसाठी महापालिका सभेकडे शिफारस या बैठकीत करण्यात आली. या विषयासह तरतूद वर्गीकरण, अवलोकनाच्या विषयासह विविध विकास विषयक बाबींसाठी झालेल्या आणि येणा-या एकूण सुमारे ६७ कोटी ४९ लाख रुपये खर्चास देखील स्थायी समितीने मान्यता दिली.

  •  ६७ कोटी ४९ लाख रुपयांच्या विकासकामांना ही मान्यता

पिंपरी (Pimpari). छोट्या मृत पाळीव प्राण्यांच्या दहनासाठी प्राणी दहन मशीनद्वारे त्यांच्या मालकांकडून महापालिका दहनशुल्क घेणार आहे. यासाठी एक हजार रुपये शुल्क आकारण्याचे स्थायी समितीने निश्चित केले असून त्यास मंजूरी दिली. या विषयाच्या अंतिम मान्यतेसाठी महापालिका सभेकडे शिफारस या बैठकीत करण्यात आली. या विषयासह तरतूद वर्गीकरण, अवलोकनाच्या विषयासह विविध विकास विषयक बाबींसाठी झालेल्या आणि येणा-या एकूण सुमारे ६७ कोटी ४९ लाख रुपये खर्चास देखील स्थायी समितीने मान्यता दिली.

महापालिका मुख्य प्रशासकीय भवनात आज स्थायी समितीची बैठक पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी संतोष लोंढे होते. महापालिका हद्दीतील कुत्रा, मांजर या सारखे पाळीव प्राणी मृत झाल्यास त्यांचे दफन करण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने नेहरूनगर येथे छोटे पाळीव प्राणी दफन भूमी कार्यान्वित असून याठिकाणी प्राणी दहन मशीन सुरू करण्यात आली आहे. याठिकाणी प्राण्यांचे दहन करण्याची कार्यवाही केली जाते. आता असे दहन करण्यासाठी त्या पाळीव प्राण्याच्या मालकाकडून दहनशुल्क घेतले जाणार आहे.

पाणीपुरवठा विभागाकडील जलशुध्दीकरण केंद्र सेक्टर क्र. २३ निगडी येथील आणि शहरातील विविध पाण्याच्या टाक्यांच्या येथे कार्यान्वित असलेल्या स्काडा प्रणालीची देखभाल दुरुस्ती करण्याकामी ७ कोटी १२ लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. प्रभाग क्र. १५ मधील परिसरात किरकोळ स्थापत्य विषयक दुरूस्तीची कामे करण्याकामी २४ लाख ८७ हजार रुपये खर्च होणार आहेत. पाणीपुरवठा विभागाकडील जलउपसा केंद्र रावेत येथील दुरुस्ती विषयक कामे करण्यासाठी ८८ लाख ६६ हजार रुपये खर्च केले जाणार आहेत. या खर्चास स्थायी समितीने मान्यता दिली.

महापालिकेच्या बीआरटीएस विभागामार्फत पिंपळे सौदागर येथे पवना नदीवर पिंपरी वाघेरे ते पिंपळे सौदागर येथे जाण्यास सध्या अस्तिवात असणा-या पुलाच्या शेजारी नवीन समांतर पुल बांधण्यात येणार आहे. हे काम नदीपात्रावर होणार असल्याने पुणे पाटबंधारे मंडळाने अटी व शर्तीनुसार या कामास नाहरकत प्रमाणपत्र दिले आहे. या नाहरकत प्रमाणपत्रातील अटीनुसार २५ लाख रुपये अनामत रक्कम सुरक्षा ठेव म्हणून कार्यकारी अभियंता खडकवासला पाटबंधारे विभाग पुणे यांचेकडे जमा करण्यास स्थायी समितीने मान्यता दिली. पुलाचे काम यशस्वीरित्या आणि व्यवस्थितपणे पूर्ण करून नदीपात्रातील राडारोडा स्वच्छ केल्यानंतर ही अनामत रक्कम पाटबंधारे विभागाकडून महापालिकेला परत केली जाणार आहे.

महानगरपालिकेच्या स्थापत्य विभागाकडील पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत ठिकठिकाणी मैला शुध्दीकरण प्रकल्प बांधणे आणि देखभाल दुरूस्ती करण्याकामी १६ कोटी २८ लाख रुपये खर्च केले जाणार आहेत.

अशुध्द जलउपसा केंद्र रावेत येथील टप्पा क्र. १ व २ योजनेअंतर्गत पंपीग मशिनरी दुरुस्तीकामी २८ लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. तसेच शहरातील विविध ठिकाणच्या शुध्द पाणीपुरवठा करणा-या पंप हाऊसचे दुरूस्ती विषयक कामे करण्यात येणार आहे. यामध्ये पिंपळेगुरव आणि दापोडीकरीता २८ लाख, सांगवी गावठाण आणि सांगवीकरीता २६ लाख, रावेत आणि पुनावळेकरीता २९ लाख, काळाखडक वाकड, काळाखडक बुस्टर व रहाटणीकरीता २९ लाख, थेरगाव गावठाण, थेरगाव आणि लक्ष्मणनगरकरीता २६ लाख, सेक्टर नं. १० आणि गवळीमाथाकरीता ३९ लाख, कृष्णानगर, सेक्टर क्र २२ आणि जाधववाडीकरीता ३९ लाख, लांडेवाडी, दिघी, च-होली आणि बोपखेलकरीता ३९ लाख रुपये खर्च होणार आहे. या खर्चास देखील स्थायी समितीने मान्यता दिली.