शहरातील रस्ते खोदाईची कामे थांबवून वाहतूक सुरळीत करण्याची विशाल वाकडकर यांची मागणी

नदीतील जलपर्णीही वाहून जाईल. अद्यापही गावठाण परिसरातील व अनेक झोपडपट्यांतील नाले साफसफाई पुर्ण झाली नाही. त्यामुळे या भागात पाणी साचून दलदल निर्माण होऊन पावसाळ्यातील साथीचे आजार वाढतील आणि सार्वजनिक आरोग्य धोक्यात येईल असे झाले तर यास मनपाचे प्रशासन आणि प्रशासनाचे प्रमुख म्हणून तुम्ही स्वता: जबाबदार असाल. त्यामुळे या विषयाबाबत आपण गांभिर्याने विचार करावा अशीही मागणी विशाल वाकडकर यांनी केली आहे.

    पिंपरी: पिंपरी चिंचवड शहरामध्ये विविध ठिकाणी अद्यापही रस्ते खोदाईची कामे सुरु आहेत. ही कामे ताबडतोब थांबवून सर्व रस्ते वाहतुकीस पुर्ववत सुरु करुन द्यावेत आणि आजपर्यंत झालेल्या या कामांचे लेखापरिक्षण करावे. तसेच प्रशासनाच्या आणि शहरातील नागरिकांच्या डोळ्यात धुळफेक करुन काम न केलेल्या नालेसफाईची बिले देणाऱ्या अधिका-यांवर कडक कारवाई करावी अशीही मागणी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे शहराध्यक्ष विशाल वाकडकर यांनी आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे पत्राव्दारे केली आहे.

    पावसाळा सुरु झाला असतानाही रस्ते खोदने, सिमेंटचे रस्ते बनविणे हे संयुक्तीक नाही, पावसामुळे या कामाचा दर्जा योग्य राहणार नाही तसेच ठिकठिकाणी पाणी साचून वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे अपघात होऊन जीवीतहानी होऊ शकते. तसेच अद्यापही शहरातील नाले, नदीची साफसफाई झाली नाही. आता काही दिवसातच मुसळधार पाऊस पडून नदीनाल्यातील कचरा वाहुन जाईल. तसेच नदीतील जलपर्णीही वाहून जाईल. अद्यापही गावठाण परिसरातील व अनेक झोपडपट्यांतील नाले साफसफाई पुर्ण झाली नाही. त्यामुळे या भागात पाणी साचून दलदल निर्माण होऊन पावसाळ्यातील साथीचे आजार वाढतील आणि सार्वजनिक आरोग्य धोक्यात येईल असे झाले तर यास मनपाचे प्रशासन आणि प्रशासनाचे प्रमुख म्हणून तुम्ही स्वता: जबाबदार असाल. याबाबत आपण योग्य ती कारवाई करावी अन्यथा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा विशाल वाकडकर यांनी या पत्राव्दारे दिला आहे.

    पिंपरी चिंचवड महनगरपालिका कार्यक्षेत्रात विविध प्रभागात आजपर्यंत अनेक ठिकाणी विविध कारणांसाठी रस्ते खोदाईची व पदपथ बांधण्याची कामे संथगतीने सुरु आहेत. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन अनेक रस्त्यांवर वाहतुक विस्कळीत होत आहे. वस्तुता: दरवर्षी 15 मे नंतर शहरामध्ये कोणत्याही कारणास्तव रस्ते खोदू नयेत. तसेच खोदलेले रस्ते पावसाळा सुरु होण्यापुर्वी दुरुस्त, डांबरीकरण करुन वाहतुकीस पुर्ववत करुन देण्याचा प्रघात आहे. परंतू यावर्षी शहरामध्ये मान्सूनचा पाऊस सुरु झाला तरीही अनेक ठिकाणी मुख्य रस्त्यांवर तसेच अंतर्गत रस्त्यांवर रस्ते खोदण्यात येत आहेत. त्यापैकी बहुतांशी ठिकाणी सिमेंट रस्ते बनविण्याचे काम सुरु आहे. तर काही ठिकाणी मलनिस्सारण वाहिनी, पावसाळी गटारे, शहरात सीसीटीव्हीचे जाळे उभारण्यासाठी केबल टाकणे, खासगी कंपन्यांच्या केबल टाकणे यासाठी रस्ते खोदण्याचे काम सुरु आहे.

    आज जून महिण्याचा पहिला आठवडा संपला असून महाराष्ट्रात यावर्षी भरपूर पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर आगामी चार दिवसात कोकण पट्ट्यात अतिवृष्टी व पश्चिम महाराष्ट्र मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. तसाच पाऊस शहरात देखिल पडण्याची शक्यता आहे. पावसाळा सुरु झाला असतानाही रस्ते खोदने, सिमेंटचे रस्ते बनविणे हे संयुक्तीक नाही, पावसामुळे या कामाचा दर्जा योग्य राहणार नाही तसेच ठिकठिकाणी पाणी साचून वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे अपघात होऊन जीवीतहानी होऊ शकते. तसेच गतवर्षी प्रमाणे याहीवर्षी प्रशासनाने पावसाळा सुरु होण्यापुर्वी नाले सफाई, पावसाळी गटारे साफसफाई, डागडुजी आणि नदीतील जलपर्णी काढणे, नदी स्वच्छतेसाठी निविदाप्रक्रीया पुर्ण केली आहे. हि कामे देखिल मे महिण्याच्या अखेरीस पुर्ण होणे अपेक्षित असताना अद्यापही शहरातील नाले, नदीची साफसफाई झाली नाही. आता काही दिवसातच मुसळधार पाऊस पडून नदीनाल्यातील कचरा वाहुन जाईल. तसेच नदीतील जलपर्णीही वाहून जाईल. अद्यापही गावठाण परिसरातील व अनेक झोपडपट्यांतील नाले साफसफाई पुर्ण झाली नाही. त्यामुळे या भागात पाणी साचून दलदल निर्माण होऊन पावसाळ्यातील साथीचे आजार वाढतील आणि सार्वजनिक आरोग्य धोक्यात येईल असे झाले तर यास मनपाचे प्रशासन आणि प्रशासनाचे प्रमुख म्हणून तुम्ही स्वता: जबाबदार असाल. त्यामुळे या विषयाबाबत आपण गांभिर्याने विचार करावा अशीही मागणी विशाल वाकडकर यांनी केली आहे.