वाहतूक कोंडीतून सुटका करण्याची टेम्पो चालकांची मागणी

पुणे : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजार आवारात हाेणाऱ्या वाहतूक कोंडीतून आमची सुटका करा, अशी मागणी टेम्पाे चालकांनी केली आहे. इतर मागण्या पूर्ण, करा असा नारा टेम्पाे पंचायतीने माेर्चा काढून दिला आहे.बुधवारी सकाळी टेम्पो पंचायतीने पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजार आवार आणि परिसरात होणाऱ्या वाहतूक कोंडी आणि टेम्पो चालकांच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी ज्येष्ठ नेते डाॅ. बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखाली माेर्चा आयाेजित केला हाेता. यावेळी टेम्पाे पंचायतीचे अध्यक्ष संताेष नांगरे हे उपस्थित हाेते.

यावेळी त्यांनी टेम्पो चालकांच्या अडचणींचा पाढा वाचला. बाजार समितीचे प्रशासक मधुकांत गरड यांनी मोर्चाला सामाेरे जात प्रश्नांबाबत लवकरात लवकर निर्णय घेऊ असे आश्वासन दिले. तसेच आंदोलन स्थगित करावे अशी विनंती करण्यात आली त्यानंतर टेम्पो पंचायतचे अध्यक्ष नांगरे यांनी मोर्चा तात्पुरता स्थगित केल्याचे सांगितले. सदर वाहतूक कोंडीचा तिढा सुटला नाही तर संपूर्ण बाजार बंद ठेवण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

सदर मोर्चाच्या वेळी कामगार युनियन अध्यक्ष किसन काळे रोशन वनवे, अर्जुन दसाडे, साजन नांगरे, तोलणार संघटनेचे हनुमंत बहिरट टेम्पो पंचायत गणेश जाधव ,चंद्रकांत जावळकर ,संजय सातपुते, सुरेश ठक्कर, हनुमंत निगडे, संजय दामोदरे,सोमनाथ शिंदे,राजकुमार शिंदे गणेश दामोदर यासह असंख्य टेम्पो चालक मालक उपस्थित होते.