
राज्यभरातील शहरी आणि ग्रामीण शाळांसंदर्भात सरसकट निर्णय (School Reopening Decision) राज्य सरकारच्या पातळीवरच घेण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुण्यात (Pune)पत्रकारांशी बोलताना दिली आहे.
पुणेः राज्यातील शाळा सुरु करण्याचा निर्णय(School Reopening Decision) आधी जिल्हाधिकारी आणि महापालिका प्रशासनावर सोपवण्यात आला होता. त्यामुळे राज्यातील काही शहरांच्या शाळा सुरु तर काही ठिकाणच्या बंद आहेत. त्यामुळे राज्यभरात(Schools Reopening In Maharashtra) विविध पातळ्यांवर मतभेद दिसून येत आहेत. त्यामुळे आता राज्यभरातील शहरी आणि ग्रामीण शाळांसंदर्भात सरसकट निर्णय राज्य सरकारच्या पातळीवरच घेण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुण्यात (Pune)पत्रकारांशी बोलताना दिली आहे.
राज्यभरातील शाळा सुरु करण्यासंदर्भातला अंतिम निर्णय बुधवारी कॅबिनेट बैठकीत घेणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली. तसेच जिल्ह्यातील यंत्रणांनाही कामाला लागण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शाळा सुरु करायच्या की नाही, याबाबत स्थानिक प्रशासनात मतभेद होण्यापेक्षा राज्य स्तरावर लवकरच निर्णय घेतला जाईल. हा एकत्रित निर्णय राज्यातील सर्वच शाळांसाठी लागू असेल, असेही अजित पवार यांनी सांगितले.
नाशिक शहरातील महापालिकेच्या हद्दीतील शाळा १३ डिसेंबरपासून सुरु करण्याचा निर्णय शिक्षण विभागानं नुकताच घेतला आहे. औरंगबाद महापालिकेने १५ डिसेंबरपर्यंत वाट पाहिल्यानंतर याबाबतचा निर्णय होईल असे सांगितले. मुंबई आणि पुणे-पिंपरी-चिंचवड येथील शाळादेखील १५ डिसेंबर नंतर सुरु करण्याचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती देण्यात आली आहे. आता बुधवारी राज्य पातळीवर सरकार काय निर्णय घेईल, हे बघावे लागेल.