राजा उदार नाही तर उधार झाला, देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना दिली राजाची उपमा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मोठा गाजावाजा केला होता. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ५० हजार रुपये हेक्टरी मदत करायला हवी, अशा मोठमोठ्या बाता त्यांनी केल्या होत्या. पण काय झालं? राजा उदार नाही, तर उधार झाला. शेतकऱ्यांच्या हाती भोपळा आला, अशी परिस्थिती सध्या महाविकास आघाडी सरकारची झाली आहे, असा सणसणीत टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.

पुणे : विधानसभेचे विरोधी पक्षनेते द्रेवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Udhav thackeray) यांच्यावर खोचक टीका आहे. दरम्यान, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ५० हजार रुपये हेक्टरी मदत करायला हवी, अशा मोठमोठ्या बाता त्यांनी केल्या होत्या. पण काय झालं? राजा उदार नाही, तर उधार झाला. असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना राजाची उपमा दिली आहे.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मोठा गाजावाजा केला होता. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ५० हजार रुपये हेक्टरी मदत करायला हवी, अशा मोठमोठ्या बाता त्यांनी केल्या होत्या. पण काय झालं? राजा उदार नाही, तर उधार झाला. शेतकऱ्यांच्या हाती भोपळा आला, अशी परिस्थिती सध्या महाविकास आघाडी सरकारची झाली आहे, असा सणसणीत टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी पुणे जिल्ह्यातील मांजरी येथील शेतकरी संवाद मेळाव्यात संबोधित केलं. केंद्र सरकारनं लागू केलेल्या कृषी कायद्यांबाबत माहिती देताना देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. केंद्र सरकारनं SDRFपैसे खर्च करण्याची परवानगी दिली आहे. राज्य सरकारच्या तिजोरीत बंगल्यावर ९० कोट्यवधी रुपये आहेत, दारूच्या अनुज्ञपती कमी करण्यासाठी पैसे आहेत, पण शेतकऱ्यांना देण्यासाठी पैसे नाहीत. सरकारनं ही नाटकबाजी बंद करायला हवी, अशा शब्दांत फडणवीस यांनी राज्य सरकारवर खोचक टीका केली.

देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना डिवचलं ?

उद्धव ठाकरे ५० हजार म्हणतात मात्र बागायतदारांना दीड लाख रुपये मदत मिळायला हवी, असं अजित पवार यांनी म्हटलं होतं. त्यानंतर ते शेतकऱ्यांचे खरे कैवारी असल्याचं आम्हाला वाटलं. पण, शेतकऱ्यांच्या हाती भोपळा आला, असं सांगत फडणवीस यांनी अजित पवार यांना सुद्धा डिवचलं आहे.