‘मी ठरवले की…’; फडणवीसांचे मोठं वक्तव्य

'मी ठरवले की नंबर वन येतोच. मात्र, महाविकास आघाडीचे नेते तीन मार्कशीट जळवून पहिले आलेले आहेत, असा टोला मावळ तालुक्यात बैलगाडा शर्यतीत आयोजन कार्यक्रमात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकार लगावला आहे.

    वडगाव मावळ : ‘मी ठरवले की नंबर वन येतोच. मात्र, महाविकास आघाडीचे नेते तीन मार्कशीट जुळवून पहिले आलेले आहेत, असा टोला मावळ तालुक्यात बैलगाडा शर्यतीत आयोजन कार्यक्रमात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकार लगावला आहे.

    मावळात बैलगाडा संघटनेच्या वतीने रविवार (दि. २०) बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. त्या कार्यक्रमाला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला.

    यावेळी त्यांनी बैल हा शेतकऱ्यांचा मित्र असल्याचे सांगत आभार मानले. यावेळी त्यांनी बैलगाडा शर्यतीवर बंदी आणणाऱ्यांवरही टीकास्त्र सोडले. ‘ज्यांनी बैलगाडा शर्यतीवर बंदी आणण्याचा प्रयत्न केला, त्यांनी मावळमध्ये येऊन पाहावे. जेव्हा आपले सरकार आले, तेव्हा आपण प्रयत्न करून बैलगाडा शर्यत पुन्हा सुरू केली. मात्र, विरोधक पुन्हा न्यायालयात गेले आणि त्यांनी बैलगाडा शर्यतीवर बंदी आणली. त्यावेळी मी एक समितीही स्थापन केली. बैल हा धावणारा प्राणी आहे. त्या संदर्भातील आवश्यक ती कायदपत्रे न्यायालयात सादर केली. त्यानंतर ही बंदी उठवण्यात आली’, असे फडणवीस म्हणाले.

    यावेळी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, माजी आमदार दिगंबर भेगडे, भाजपचे प्रभारी भास्कराव म्हाळसकर, तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे, बैलगाडा संघटनेचे अण्णासाहेब भेगडे आदीजण उपस्थित होते.