देवेंद्र फडणवीस हे ‘दबंग’ नेते असून , उपमुख्यमंत्र्यासारखे १०० अजित पवार खिश्यात घेऊ फिरतात… ‘या’ नेत्याने केली टीका

  हसन मुश्रीफ यांना माझं नाव घेतल्याशिवाय त्यांना झोप लागत नाही. माझ्या विरुद्ध अब्रुनुकसानीचा दावा करू शकतात. अनिल देशमुख यांच्यावर ईडीची कारवाई झाली पण ते माहिती देत देत सहकुटुंब गायब झाले. तसाच मार्ग मुश्रीफ यांच्याकडे असल्याचं ते म्हणाले आहेत.

    पुणे: ” माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस(Leader of Opposition Devendra Fadnavis) हे ‘दबंग’ नेते असून ते उपमुख्यमंत्र्यासारखे शंभर अजित पवार खिश्यात घेऊ फिरतात” असं वक्तव्य पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत भाजप आमदार चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.

    ”चंद्रकांत पाटलांनी (Chandrakant Patil) मला भाजपमध्ये प्रवेश करण्याची ऑफर दिली असल्याचा दावा महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Rural Development Minister Hasan Mushrif) यांनी केला होता”. मुश्रीफांच्या या दाव्यावर चंद्रकांत पाटलांनी खुलासा करत मुश्रीफांना मी अशी कोणतीही ऑफर दिली नव्हती. त्यांनी ड्रामा करणं बंद करावं असं पाटलांनी स्पष्टपणे सांगितलं आहे.

    हसन मुश्रीफांना कोणतीही ऑफर नव्हती. एखाद्याला ऑफर दिली आणि त्यांनी ती नाकारली तर ती मेरिटवर नाकारतात कुणालाही त्रास देण्याचं कल्चर आमचं नाही. मुश्रीफांनी हा सगळा ड्रामा बंद करावा असेही पाटील म्हणाले आहेत.

    मुश्रीफ यांना सांगायचंय पॅनिक होऊन काही होत नसत. कारवाई झाल्यानं आणि घोटाळे बाहेर पडत असल्याने मुश्रीफांचा ड्रामा सुरु आहे. अमुक-तमुक करणार, माझे हितचिंतक रस्त्यावर येणार, कुठलीतरी परिस्थिती दाखवायची, मला त्यांना सांगायचंय, ड्रामा बंद करा, कायद्याची लढाई कायद्याने लढा

    आमदार चंद्रकांत पाटील