ऐकलं का पुणेकरांनो; कात्रजचा खून झाला..!

कात्रज चौकात एका मोकळ्या जागेत २० बाय ५०चा भला मोठा फ्लेक्स अज्ञातांनी लावला आहे. काळ्या आणि लाल रंगात त्यावर "कात्रजचा खून झाला" असे लिहीत चाकू आणि रक्त दाखवले आहे. भल्या सकाळी कात्रजकराना हा फ्लेक्स दिसून आल्यानंतर मोठा गोंधळ उडाला. गर्दीने फुललेल्या या परिसरात ही माहिती वेगाने पसरली आणि स्थानिकांनी येथे धाव घेतली. पण, हा फ्लेक्स कोणी लावला आणि त्याचा नेमका संबंध कोणाशी असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे येथे उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.

    पुणे : कात्रजचा घाट सर्वांनी परिचित आहे, पण आज चक्क कात्रजचा खून झाला असल्याचे समोर आले असून, या प्रकरणाने पुण्यात चांगलीच चर्चा सुरू झाली आहे. मोकळ्या जागेत “कात्रजचा खून झाला”असा मजकूर असलेला एक भला मोठा फ्लेक्स लावण्यात आला आहे. त्यात रक्ताचे डाग आणि एक चाकू दाखवला आहे. त्यामुळे कात्रजमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

    प्रकरण अस आहे, कात्रज चौकात एका मोकळ्या जागेत २० बाय ५०चा भला मोठा फ्लेक्स अज्ञातांनी लावला आहे. काळ्या आणि लाल रंगात त्यावर “कात्रजचा खून झाला” असे लिहीत चाकू आणि रक्त दाखवले आहे. भल्या सकाळी कात्रजकराना हा फ्लेक्स दिसून आल्यानंतर मोठा गोंधळ उडाला. गर्दीने फुललेल्या या परिसरात ही माहिती वेगाने पसरली आणि स्थानिकांनी येथे धाव घेतली. पण, हा फ्लेक्स कोणी लावला आणि त्याचा नेमका संबंध कोणाशी असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे येथे उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.

    नेमकं राजकारण, नुकताच उड्डाणपूल उदघाटन आणि कात्रज कोंढवा रोडचा जागा संपादन विषय असे अनेक अर्थ आता नागरिक काढू लागले असून, त्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. पण, सध्या या फ्लेक्सने पुण्याचे लक्ष वेधले आहे. पोलिसांकडे हे प्रकरण गेले आहे. त्यामुळे पोलिसांत तक्रार दाखल झाल्यास पोलिसांना हा फ्लेक्स नेमका कोणी आणि का लावला याचा शोध घ्यावा लागणार आहे. त्यानंतर सत्य समोर येणार आहे.