बीज सोहळयास दिंड्या आणू नये ; संत तुकाराम महाराज संस्थानाचे आवाहन

कोरोनाच्या पार्श्व्भूमीवर पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी  केवळ ५० नागरिकांच्या उपस्थितीत सोहळा साजरा करावा, असा आदेश काढला आहे. त्यामुळे संस्थानेही वारकरी आणि भाविकांना सोहळ्यास न येण्याचे आवाहन केले आहे. तसेच, हा सोहळा गाथा पारायण करून घरीच साजरा करण्याचे आवाहन केले आहे. त्याचप्रमाणे बीज सोहळ्यानंतर ३१ मार्चला पालखी सोहळ्यानिमित्त दिंड्यावाल्यांची बैठकही स्थगित करण्यात आल्याचे पत्रकात म्हटले आहे.

    पिंपरी : जगद्गुरु संत तुकाराम महाराज बीज सोहळा येत्या ३० मार्च रोजी आहे. परंतू कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर बीज सोहळा शासनाच्या आदेशानुसार ५० भाविकांच्या उपस्थितीत होणार आहे. त्यामुळे राज्यातील सर्व वारकरी आणि दिंडीकरांनी यांची नोंद घ्यावी. येत्या ३० तारखेला होणाऱ्या बीज सोहळ्यास कोणीही देहूत येवू नये, असे आवाहन संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने पत्रकाद्वारे करण्यात आले आहे. संत तुकाराम महाराज यांचा ३७३ वा सदेह वैकुंठगमन सोहळा म्हणजे बीज सोहळा येत्या ३० मार्चला आहे.

    कोरोनाच्या पार्श्व्भूमीवर पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी  केवळ ५० नागरिकांच्या उपस्थितीत सोहळा साजरा करावा, असा आदेश काढला आहे. त्यामुळे संस्थानेही वारकरी आणि भाविकांना सोहळ्यास न येण्याचे आवाहन केले आहे. तसेच, हा सोहळा गाथा पारायण करून घरीच साजरा करण्याचे आवाहन केले आहे. त्याचप्रमाणे बीज सोहळ्यानंतर ३१ मार्चला पालखी सोहळ्यानिमित्त दिंड्यावाल्यांची बैठकही स्थगित करण्यात आल्याचे पत्रकात म्हटले आहे. बैठकीची तारीख नंतर कळविण्यात येणार आहे. संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष मधुकर महाराज मोरे यांची पत्रकावर स्वाक्षरी आहे.