केंद्रीय अर्थसंकल्पकाकडून उद्योग विश्वाची निराशा

केंद्रीय अर्थसंकल्पकाकडून उद्योग जगताला खूप अपेक्षा होत्या. मात्र, या अर्थसंकल्पातून त्या पूर्ण न झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे उद्योग जगताला केंद्र सरकारने निराश केले आहे, अशा प्रतिक्रिया विविध उद्योजकांनी व्यक्त केल्या.

  पिंपरी : केंद्रीय अर्थसंकल्पकाकडून उद्योग जगताला खूप अपेक्षा होत्या. मात्र, या अर्थसंकल्पातून त्या पूर्ण न झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे उद्योग जगताला केंद्र सरकारने निराश केले आहे, अशा प्रतिक्रिया विविध उद्योजकांनी व्यक्त केल्या.

  कोरोनामुळे उद्योगांची परिस्थिती ही बिकट झाली होती. त्यामुळे या अर्थसंकल्पात केंद्र सरकार उद्योगांसाठी काही भरीव तरतूद करेल, अशी आमची अपेक्षा होती. पण त्याकडे सरकारने लक्ष दिलेले नसल्याचे फेडरेशन ऑफ असोसिएशन्स ऑफ पिंपरी-चिंचवडचे अध्यक्ष गजानन बाबर यांनी असोसिएशन च्या वतीने केंद्रीय अर्थसंकल्पाबाबत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करण्यासाठी आयोजित कार्यक्रमात सांगितले. सरकार चालवण्यासाठी कर गोळा करणे आवश्यकच आहे. सरकारही याच पद्धतीने चालते. प्रादेशिक भाषांना प्रोत्साहन देणे, लेहमध्ये विद्यापीठाची स्थापना करणे, १०० सैनिकी शाळा सुरू करणे, राज्यांना कर्ज घेण्याची परवानगी देणे, हे सरकारने घेतलेले निर्णय निश्चितच स्वागतार्ह आहेत. परंतु उद्योगांच्या बाबतीत सरकारने निराशा केली असल्याचे बाबर यांनी सांगितले.

  फोर्ब्स मार्शलचे सहअध्यक्ष आणि सीआयआयचे माजी अध्यक्ष डॉ. नौशाद फोर्ब्स बजेटबद्दल मत व्यक्त करताना म्हणाले, यंदाचा अर्थसंकल्प अर्थमंत्र्यांनी अभूतपूर्व परिस्थितीत सादर केला . मात्र दरसालाप्रमाणेच हा अर्थसंकल्प असल्याचे त्यांनी सांगितले.या अर्थसंकल्पात खासगीकरण या शब्दाचा अधिक वापर करण्यात आला आहे.जो अर्थव्यवस्थेसाठी निरोगी आहे. बर्‍याच वर्षांपासून आपण सरकारचा हस्तक्षेप कमी आणि  प्रशासनाकडून जलद अमंलबजावणी व्हावी, यासाठी प्रयत्नशील आहोत मात्र आता हे धोरण प्रत्यक्षात अमंलात येईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, अर्थसंकल्पातील दोन गोष्टींबद्दल मी साशंक आहे. पहिली म्हणजे आधी आपण भूतकाळात जे केले नाही ते आपण कसे अंमलात आणू? खाजगीकरणाचे लक्ष्य आपण मांडले होते. मात्र ते या वर्षी आणि मागील वर्षी अयशस्वी झाल्यावर इथून पुढे कसे अंमलात आणणार ? आणि दुसरे, आपण म्हणतो की, आम्हाला जगभर व्यापार करायचा आहे मात्र असे म्हणत असतानाच आपण सीमा शुल्कही वाढवत आहोत. जे आपण या अर्थसंकल्पातही वाढवला आहे.तर मग व्यापार कसा वाढवणार ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला

  फेडरेशन ऑफ असोसिएशनचे कार्याध्यक्ष गोविंद पानसरे म्हणाले, हा अर्थसंकल्प ‘थोडी खुशी आणि थोडा गम’ देणारा आहे. या अर्थसंकल्पाने लघु उद्योगांना नाराज केले आहे. सरकारचा हेतू हा पैसा फक्त तिजोरीत येऊ द्या, असे दर्शवणारा आहे. सरकारला पैसे खर्च करायचे नाहीत, हे या बजेटमधून दिसून येते.पेट्रोल, डिझेलच्या किंमती आकाशाला भिडल्या आहेत. इंधनाला जीएसटीच्या कक्षेमध्ये आणावे, अशी आमची सुरवातीपासून मागणी आहे. पण, त्याकडेही दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे..पण कृषी क्षेत्राला चालना देणे किंवा डिजीटल व्यवहारांना चालना देणे यांसारखे चांगले निर्णयही सरकारने घेतले असल्याचे पानसरे म्हणाले.

  मधुकर गायकवाड म्हणाले, हे व्यापा-यांचे सरकार आहे. व्यापारांनी दुस-यांदा या सरकारला निवडून दिले परंतु नेहमीप्रमाणे मायबाप सरकारने व्यापा-यांकडेच दुर्लक्ष केले. ज्यांच्याकडून सरकारला चांगला रेव्हेन्यु मिळतो, त्यांच्याकडे दुर्लक्ष आणि जे उनाड आहेत त्यांचे मात्र सरकारने लाड केले असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.

  पिंपरी-चिंचवड प्लास्टिक असोसिएशनचे अध्यक्ष योगेश बाबर म्हणाले, कोरोनाकाळात जी पॅकेजेस जाहीर केली गेली, ती या वर्षी तशीच पुढे चालू राहणार आहेत की ही पॅकेजेस मागे घेतली जाणार आहेत, हे मात्र या बजेटमध्ये कुठेही स्पष्ट करण्यात आलेले नाही. १५ वर्षांनी गाड्या स्क्रॅप करण्याची योजना, ज्येष्ठ नागरिकांना पेन्शनमध्ये सूट तसेच लोखंड, तांबे, नायलॉन यांच्यावरच्या ड्युटीज कमी करणे, ई-बसेससाठी भरीव तरतूद करणे, मेट्रोसाठी तरतूद अशा योजना निश्चितच स्वागतार्ह असल्याचे बाबर यांनी यावेळी सांगितले.

  नायलॉन उद्योगांसाठी मात्र अर्थसंकल्पामध्ये काही तरतूदी केल्या आहेत. पायाभूत सुविधा, कच्चा माल या गोष्टींवर भर दिला गेल्याने याचा थोडा फायदा नायलॉन उद्योग व यांसारख्या कच्च्या मालावरील लघु-उद्योगांना यांचा फायदा होऊ शकतो, असे नितीन कोंढाळकर यांनी सांगितले. तर ॲटोमोबाईल उद्योगांसाठी हे बजेट योग्य नसल्याचे मत नंदकिशोर जगदाळे यांनी यावेळी व्य्क्त केले.

  हॉटेल उद्योगांवर सरकारने अन्याय केला असून खाद्यावर सुद्धा १८ % जीएसटी भरावा लागत आहे. यामुळे कामगार मिळत नसून मध्यमवर्गीयांचे हाल होत आहेत. कोरोना काळात हॉटेल व्यवसाय पूर्णपणे कोलमडला असून सरकारने हॉटेल उद्योगांना चालना देणे गरजेचे आणि अपेक्षित होते. त्यामुळे हॉटेल उद्योग या अर्थसंकल्पावर नाराज असल्याचे फेडरेशनचे उपाध्यक्ष मधुकर बाबर यांनी सांगितले.

  पिंपरी चिंचवड़ लघुउद्योग संघटना चे अध्यक्ष संदीप बेलसरे म्हणाले की, करोना महामारीनंतर एमएसएमई उद्योगांना पाठबळ न देणारा हा केंद्रीय अर्थसंकल्प आहे. लोखंडाच्या कस्टम ड्युटी मध्ये ७.५ टक्के कपात अँटी डम्पिंग ड्युटी रद्द करण्याचे उपाय लोखंडाचा वाढता दर कमी करण्यासाठी अपुरे आहेत कारण दर जवळपास ६० टक्क्यांनी वाढले आहेत व वरील घोषणेमधून फक्त ९ ते १०% दर कमी होऊ शकतात. सरकारने लोखंड व इतर धातूंचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी काययमस्वरूपी एमएसपी ठरवावी. सूक्ष्म लघु व मध्यम उद्योगांसाठी १५ हजार ७०० करोड रुपयांची तोकडी तरतूद करण्यात आली आहे ती तिप्पट करण्याची गरज आहे. आयकर कुठेही कमी केलेला नाही जो कमी करणे अपेक्षित होते आयकर असेसमेंट ६ वरून ३ वर्ष केली आहे व ऑनलाईन केली आहे त्याचे स्वागत करतो यामुळे आयकर विभागातील भ्रष्टाचार रोखण्यात मदत होईल छोट्या करदात्यांची अडचण सोडविण्यास मदत होईल.

  पावन नंदा, सह-संस्थापक, विन्झो गेम्स म्हणाले, “सरकारने जाहीर केलेल्या उपाययोजना स्टार्टअप इकोसिस्टमच्या दिशेने तेजी दाखवते. दुसर्‍या वर्षाच्या दीर्घ मुदतीच्या भांडवलाच्या मुदतीत वाढ केल्याने सुरुवातीच्या निधीस टेलविंड्स मिळतील. कर सुट्टी एक वर्षाने वाढविणे देखील एक प्रोत्साहनदायक पाऊल आहे, तथापि, बहुतेक नवीन स्टार्टअप्स प्रारंभिक वर्षांमध्ये नफा कमविण्यास सुरुवात करत नाहीत. अर्थसंकल्पात आर्थिक विकास, पायाभूत सुविधा आणि आरोग्याकडे लक्ष देण्यात आले आहे. मागील आर्थिक वर्षानंतर निश्चितच भारत विकासाच्या मार्गावर जाईल.”

  पेटीएमचे मुख्य वित्तीय अधिकारी विकास गर्ग म्हणाले, “अर्थमंत्र्यांनी एक संतुलित अर्थसंकल्प सादर केला आहे ज्याचा उद्देश येत्या वर्षात सर्व क्षेत्रांची जास्तीत जास्त वाढ होईल हा आहे. डिजिटल पेमेंट्सला प्रोत्साहन देण्यासाठी १५०० कोटी रुपयांची प्रस्तावित योजना हे एक स्वागतार्ह पाऊल आहे, ज्यामुळे आपल्या देशात कॅशलेस व्यवहाराच्या वाढीस वेग मिळेल. साथीच्या काळात, डिजिटल पेमेंट्स तळागाळातील सशक्तीकरणाच्या प्रमुख समर्थकांपैकी एक बनली आणि कोट्यवधी लोकांना औपचारिक अर्थव्यवस्थेच्या पलीकडे आणले. सरकारने पायाभूत सुविधांमधील गुंतवणूक वाढवण्यावर सतत भर दिला, विमा आणि डिजिटल पेमेंटमुळे जनतेचा आर्थिक समावेश सुनिश्चित होईल.”

  जॉबी, केजीएफएस, सीईओ म्हणाले, “केंद्रीय अर्थसंकल्प २०२१ मध्ये एनबीएफसी आणि कृषी पत क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या सहकारी संस्थांना मान्यता देण्यात आली आहे. वित्तीय संस्थांच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यासाठी यंत्रणा आणण्याचा सरकारचा पुढाकार, ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड आणि ॲसेट मॅनेजमेंट कंपनी स्थापन करून आणि ठेवीदारांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी एक मजबूत बँकिंग यंत्रणेच्या दृष्टीने योग्य पाऊल आहे. या व्यतिरिक्त, कृषी पतधोरण लक्ष्यात वाढ, एमएसएमई क्षेत्राकडे वाटप वाढविणे आणि अर्थसंकल्पातील स्थलांतर कामगार व मजुरांवर लक्ष केंद्रित करणे हे एनबीएफसी आणि एमएफआयसाठी अत्यधिक फायद्याचे ठरेल. अर्थसंकल्पातील उत्तम भांडवल उपलब्धतता, सुधारित प्रशासन आणि सुधारित कर्ज देण्याची यंत्रणा ही मुख्य केंद्रे आहेत आणि यामुळे वित्तीय संस्थांना या क्षेत्रातील पारदर्शकता आणि उत्तरदायित्व आणता येईल. बँकिंग रिफॉर्म्स बॅड लोन, कॅपिटल इन्फ्युजन, फिनटेक्सचा विकास आणि एनबीएफसीला पाठिंबा देण्यास प्रयत्न करेल. अर्थसंकल्पामधील डिजिटल व्यवहारास प्रोत्साहन आणि सतत आर्थिक समावेशनावर भर यावर लक्ष केंद्रित करणे हे दोन अर्थसंकल्पातील मुख्य स्तंभ आहेत जे समाजातील अधोरेखित घटकांच्या आर्थिक लँडस्केपची रूपरेषा दर्शवितात.”

  फाडा अध्यक्ष विंकेश गुलाटी म्हणाले, “फेडरेशन ऑफ ऑटोमोबाइल डीलर्स एसोसिएशन आनंदी आहे की माननीय अर्थमंत्र्यांनी अपेक्षित स्क्रॅपेज नितीची घोषणा केली आहे, ज्यामुळे जुन्या वाहनांना फेज आऊट केले जाईल. जर आम्ही १९९० ला बेस इयर धरले तर जवळजवळ ३७ लाख कमर्शियल वाहने आणि ५२ लाख पॅसेंजर वाहने स्वैच्छिक रित्या स्क्रॅपेज पॉलिसाच्या योग्य आहेत. एक अनुमानानुसार १०% कमर्शियल वाहने आणि ५% पॅसेंजर वाहने अजूनही रस्त्यावर धावत आहेत. आम्हाला अजूनही त्या प्रकारच्या प्रोत्साहनांचा उपयोग करण्यासाठी मुख्य प्रत पाहण्याची गरज आहे जे प्रस्तावावर असतील आणि अशा प्रकारे रिटेलवर सकारात्मक प्रभाव पडेल.

  तामिळनाडू, केरळ, पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये प्रस्तावित ६,५७५ कि.मी. महामार्गाचे काम आणि भारत माला प्रकल्पासाठी १९,५०० किलोमीटरच्या कामांमुळे व्यावसायिक वाहने विशेषत: मिडीयम आणि हेवी कमर्शियल विभागाचे पुनरुज्जीवन होण्यास मंडळ मिळेल.

  सरकारने स्टील उत्पादनांवरील सीमा शुल्कात ७.५% कपात केल्याने ऑटो ओइएमला फायदा होईल. यामुळे आम्ही आशा करतो कि याचा ग्राहकांनाही लाभ होईल आणि ग्राहकांची मागणी वाढविण्यास मदत मिळेल.

  आयटी स्लॅबच्या वाढीमुळे आणि व्यक्तींसाठी वाहनांवर घसारा होण्याच्या फायद्यांसह व्यक्तींसाठी डिस्पोजेबल उत्पन्नाची आम्हाला अपेक्षा होती, परंतु त्याची दखल घेतली गेली नाही.”