”तुम्ही मला कसलीही कारणं सांगू नका, जरा माझ्या गतीने कामे करा” म्हणत उपमुख्यमंत्री चिडले ; जाणून घ्या कारण ?

धिकाऱ्यांनी पेट्रोल पंपाच्या परवानगीच्या कामात उशीर होत असल्याबद्दल कारण सांगितले. यावेळी अजित पवारांनी मला कारणं सांगू नका, जरा माझ्या गतीने कामे करा. दिवाळीपूर्वी कामे पूर्ण करा, लागेल तिथे सहकार्य करु, अशा सूचनाही दिल्या.

    बारामती: आपल्या कामाच्या बाबतीत चोख आणि स्पष्टवक्तेपणासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) ओळखले जातात. कामामध्ये केलेला हलगर्जीपणा त्यांना अजिबातच आवडत नाही, याचाच प्रयत्य पुन्हा एकदा प्रशासनातील अधिकाऱ्यांना (slapped)आला आहे. आज अजित पवारांनी बारामतीमधल्या नियोजित कार्यक्रमांना हजेरी लावली असताना त्यांनी खरेदी विक्री संघाच्या पदाधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतेले. ”तुम्ही मला कसलीही कारणं सांगू नका, जरा माझ्या गतीने कामे करा”, (Don’t give me any reason, just work at my speed”)असे खडे बोल सुनावत अजित पवार यांनी पदाधिकाऱ्यांसह अधिकाऱ्यांनाही चांगलेच झापले

    यावेळी अधिकाऱ्यांनी पेट्रोल पंपाच्या परवानगीच्या कामात उशीर होत असल्याबद्दल कारण सांगितले. यावेळी अजित पवारांनी मला कारणं सांगू नका, जरा माझ्या गतीने कामे करा. दिवाळीपूर्वी कामे पूर्ण करा, लागेल तिथे सहकार्य करु, अशा सूचनाही अजित पवार यांनी अधिकाऱ्यांसह पदाधिकाऱ्यांना दिल्या.

    याबरोबरच केंद्र सरकारने(central Government) जिल्हा सहकारी बँकेवर निर्बंध (Restrictions on District Co-operative Banks)घातले आहेत. त्याच्या विरोधात राज्य सरकार कोर्टात जाणार असल्याची माहिती अजित पवारांनी दिली. जिल्हा बँक चालवण्याचा अधिकार केंद्र सरकारने जवळपास काढून घेतला आहे. त्यामुळे राज्य सरकार कोर्टात जाणार असल्याची माहितीही अजित पवार यांनी दिली.

    आम्ही चांगल्या पद्धतीने बँक चालवण्याचा प्रयत्न केला. पहिल्या पाच बँकांमध्ये सातारा आणि पुणे जिल्हा बँक आहे. आर्थिक व्यवहार आपल्या ताब्यात यावेत यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करीत आहेत. त्याच्या विरोधात आम्ही चांगल्या वकिलाचा सल्ला घेऊन सहकार विभागाच्या वतीने पुढे कसे जायच याचा विचार करीत आहोत, असे ते म्हणाले.