Murder In Pune : पुण्यात डबल मर्डर; जामीनावर जेल बाहेर आलेल्या गुन्हेरासह त्याच्या बापाचा दगडाने ठेचून ठेचून जीव घेतला

पुण्यात एका रात्रीत दोन खून झाल्याने खळबळ उडाली आहे. जामीनावर जेल बाहेर आलेल्या गुन्हेरासह त्याच्या पित्याची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आहे. या दुहेरी हत्याकांडामुळे परिसरात दहशत पसरली आहे(Double Murder In Pune; His father was stoned to death along with a criminal who was released on bail).

  पुणे : पुण्यात एका रात्रीत दोन खून झाल्याने खळबळ उडाली आहे. जामीनावर जेल बाहेर आलेल्या गुन्हेरासह त्याच्या पित्याची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आहे. या दुहेरी हत्याकांडामुळे परिसरात दहशत पसरली आहे(Double Murder In Pune; His father was stoned to death along with a criminal who was released on bail).

  सनी कुमार शिंदे (वय 22 वर्ष) आणि कुमार शिंदे (वय 55 वर्ष) अशी हत्या झालेल्या बापलेकांची नावं आहेत. सनी खुनाच्या गुन्ह्यात तुरुंगात शिक्षा भोगत असताना जामिनावर बाहेर आला होता.

  गेल्या वर्षी एका खून प्रकरणात सनी शिंदे याला अटक झाली होती. गेल्या काही महिन्यांपासून तुरुंगात असलेल्या सनीची 3 महिन्यांपूर्वी जामिनावर मुक्तता झाली होती. तो तुरुंगाच्या बाहेर आल्यावर लोणीकंद येथील शाळेच्या पाठीमागे अज्ञात हल्लेखोरांनी त्याचा खून केल्याचा आरोप आहे.

  हा डबल मर्डर नेमका कोणी केला, याचं गूढ अद्याप उलगडलेलं नाही. भररस्त्यात रात्रीच्या वेळेस हत्या केल्यानंतर आरोपी हल्लेखोर पसार झाले. गुन्हेगारी प्रकरमातून हे खून झाले असावेत असा पोलिसांना संशय आहे. पोलिस मारेकऱ्यांचा शोध घेत आहेत.

   

  हे सुद्धा वाचा
  • 2022