डॉ.गेलं यांचे सत्यशोधक चळवळीत मोलाचे योगदान – डॉ.सदानंद मोरे

डॉ. गेल यांनी सत्यशोधक आणि ब्राह्मणेतर चळवळीचे जे विश्लेषण केले, ते फार मोलाचे होते त्यामुळे त्यांचे योगदान विसरता येणार नाही; असे महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष, या विषयांचे व्यासंगी तज्ञ डॉ. सदानंद मोरे यांनी नमूद केले.

  पुणे: डॉ.गेल यांनी सत्यशोधक आणि ब्राम्हणेतर चळवळीचे विश्लेषण करून येथील समाजव्यवस्थेवर प्रकाश टाकून अतिशय मोलाचे योगदान दिले असल्याचे मत डॉ .सदानंद मोरे यांनी पुणे विद्यापीठात आयोजित चर्चासत्रात व्यक्त केले.डॉ.गेल अॉमवेट यांचे नुकतेच निधन झाले आहे.त्यानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .यावेळी कुलगुरु डॉ.नितीन करमळकर , डॉ.मनोहर जाधव ,डॉ सुरेंद्र जोंधळे, यासह मान्यवर उपस्थित होते.
  प्रा.डॉ गेल ऑम्वेट यांच्या वैचारिक योगदानाची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अभिवादन सभेत विचारमंथन माध्यमातून अतिशय सुयोग्य अशी नोंद घेण्यात आली. (मूळ अमेरिकन असलेल्या आणि १९८२ पासून भारतीय नागरिक झालेल्या विदुषी आणि डॉ.भारत पाटणकर यांच्या जीवनसाथी डॉ.गेल यांचे (दि.२५ ऑगस्ट २०२१) रोजी सांगली जिल्ह्यातील कासेगाव येथे निधन झाले. कुलगुरू डॉ. नितीन करमळकर आणि प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या अभिवादन सभेत
  ‘ प्रा.डॉ. गेल ऑम्वेट : सैद्धांतिक आकलन ‘, या विषयावर चर्चा आयोजिण्यात आली होती. विशेष म्हणजे विद्यापीठाच्या चार विभागांनी – भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासन, स्त्री आणि लिंगभाव अभ्यास विभाग, इतिहास विभाग आणि आजीवन अध्ययन व विस्तार विभाग यांनी अभिवादन सभेचे आयोजन केले होते.

  डॉ. गेल यांनी सत्यशोधक आणि ब्राह्मणेतर चळवळीचे जे विश्लेषण केले, ते फार मोलाचे होते त्यामुळे त्यांचे योगदान विसरता येणार नाही; असे महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष, या विषयांचे व्यासंगी तज्ञ डॉ. सदानंद मोरे यांनी नमूद केले. ते म्हणाले की, महाराष्ट्रातील सत्यशोधक ब्राह्मणेतर चळवळीचे योगदान डॉ.गेल,डॉ.य. दि. फडके आणि डॉ. बाबा आढाव यांनी सखोल प्रमाणात मांडणी करण्याचे मोठे काम केले. याच अभ्यासात सत्यशोधक विचारांचे ज्येष्ठ अभ्यासक वाई येथील रा.ना. चव्हाण यांचाही उल्लेख डॉ. मोरे यांनी केला.

  फुले-आंबेडकरांचा शोध घेताना गेल या तुकोबांकडे येणार होत्याच, आणि त्याप्रमाणे त्या शोधत देहूला आल्या. पुढे भारत पाटणकर यांच्याबरोबर तुकारामांचे अभंग त्यांनी अनुवादित केले. मी नगरला असताना गेल या माझ्या देहूच्या घरी येऊन गेल्याची माहिती माझ्या बहिणीने मला दिली होती,अशी आठवण डॉ. मोरे यांनी सांगितली.

  प्रा. डॉ. सुरेंद्र जोंधळे यांनी गेल यांचे फुले-आंबेडकरी चळवळीचे विश्लेषण आणि विचार मंथन हे जागतिक विद्यापीठांच्या स्तरावर नोंदले गेले, असा मुद्दा मांडला. गेल यांच्या निधनानंतर भारतातील विविध विद्यापीठांमधून त्यांना अभिवादन करताना त्यांच्या वैचारिक विश्लेषणाचे योगदान अधोरेखित केले जात असल्याचे ते म्हणाले.

  या अभिवादन सभेत अरुण खोरे यांनी भारतातील दलित, मागास आणि कृषक वर्गाच्या बळीराजासारख्या प्रतीकांचे महत्त्व डॉ. गेल यांनी नव्याने मांडले, असे सांगितले. फुले-आंबेडकरी चळवळीला १९७० नंतर जी गती मिळाली, त्याला वैचारिक दिशा देण्याचे मोठे काम डॉ.गेल आणि त्यांच्या प्राध्यापक गुरु डॉ.एलिनोर झेलीयट यांनी केले, असे ते म्हणाले.

  डॉ. आंबेडकर अध्यासनाचे डॉ. मनोहर जाधव,इतिहास विभागाच्या डॉ.श्रद्धा कुंभोजकर, स्त्री आणि लिंगभाव अभ्यास विभागाचे प्रा.संजयकुमार कांबळे आणि आजीवन अध्ययन विभागाचे डॉ. धनंजय लोखंडे यांना या वैशिष्ट्यपूर्ण अभिवादन सभेचे श्रेय दिले पाहिजे. या चर्चासत्रासाठी प्रा. डॉ. राजेश्वरी देशपांडे, जयदेव गायकवाड, विजय जाधव, याबरोबरच राणी जाधव, प्रा. श्रीनिवास हेमाडे, प्रा. सुलभा पाटोळे,केशव वाघमारे असे अनेक जण उपस्थित होते.