Due to the decision of Thackeray government Pune Municipal Corporation has the largest area in the state nrvb

२०१७ साली पहिल्या टप्प्यात ११ गावं तरउर्वरित २३ गावं पुढील तीन वर्षांत टप्प्याटप्प्याने घेण्याचे प्रतिज्ञापत्र सादर केले होते. त्यानुसार काल २३ गावांची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

पुणे : शहराच्या हद्दीलगत असलेली २३ गावं पुणे महापालिकेत समाविष्ट करण्यासंदर्भातील अधिसूचना राज्य सरकारने काल प्रसिद्ध केली. यामुळे पुणे महापालिका ही राज्यातील सर्वात मोठी महापालिका आणि शहर होण्याचा बहुमान मिळाला आहे.पुणे शहराच्या हद्दीलगतची ३४ गावं महापालिकेत समाविष्ट करून घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. त्यानुसार २०१७ साली पहिल्या टप्प्यात ११ गावं तरउर्वरित २३ गावं पुढील तीन वर्षांत टप्प्याटप्प्याने घेण्याचे प्रतिज्ञापत्र सादर केले होते. त्यानुसार काल २३ गावांची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

आता याबद्दल कोणत्याही व्यक्तीला हरकती किंवा सूचना असल्यास विभागीय आयुक्तांकडे अधिसूचना प्रसिद्ध झाल्यापासून ३० दिवसांच्या आत दाखल करण्याचा कालावधी असणार आहे. आता २३ गावे महापालिकेत समाविष्ट होणार असल्याने राज्यातील सर्वाधिक मोठ्या क्षेत्रफळाची महापालिका ठरली आहे.

पुणे महापालिकेत समाविष्ट होणाऱ्या गावांची नावे :

वडाची वाडी, नांदोशी सणसनगर, मांगडेवाडी, भिलारेवाडी, गुजर निंबाळकरवाडी, मांजरी बुद्रुक , नऱ्हे, मंतरवाडी, शेवाळेवाडी, कोंढवे धावडे, न्यू कोपरे, नांदेड, औताडे-हांडेवाडी, जांभूळवाडी, कोळेवाडी आणि होळकरवाडी, वाघोली, किरकटवाडी, खडकवासला, महाळुंगे, सूस, बावधन बुद्रुक, पिसोळी