
लसीकरणाने वेग पकडला असून, पहिला शंभर टक्के झाला आहे. आता दुसरा डोस शंभर टक्के करण्यासाठी प्रशासनाकडून नियोजन करण्यात येत असून, लवकरात लवकर दुसरा डोसही पूर्ण करण्यासाठी प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात येत आहे. ओमायक्रॉनच्या धोक्यामुळे कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
पुणे : ओमायक्रॉनचे रुग्ण आढळून आल्याने पुणे शहरासह जिल्ह्यातील कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा वेग वाढला आहे. मागील दहा दिवसांमध्ये सरासरी साठ हजारांहून अधिक लसीकरण झाले, तर पाचवेळा एक लाखापर्यंत लसीकरण झाले आहे. या दहा दिवसांमध्ये आठ लाख लसीकरण झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. काही दिवसांपासून लसीकरणाचा वेग कमी झाला होता. त्याबाबत जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनीही नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर मात्र लसीकरणाने वेग पकडला असून, पहिला शंभर टक्के झाला आहे. आता दुसरा डोस शंभर टक्के करण्यासाठी प्रशासनाकडून नियोजन करण्यात येत असून, लवकरात लवकर दुसरा डोसही पूर्ण करण्यासाठी प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात येत आहे. ओमायक्रॉनच्या धोक्यामुळे कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. दहा दिवसांत झालेल्या लसीकरणामध्ये पहिला डोस ३३ टक्के, तर दुसरा डोस ६७ टक्के एवढा झाला आहे. मागील आठवड्यामध्ये २ लाख ६४हजार ४३२ जणांनी पहिला, तर ५ लाख २९ हजार ८३३ दुसर्या लसीचा डोस घेतला आहे.