राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी यश साने यांची निवड

. पक्षाने यश यांच्यावर विद्यार्थी संघटनेची जबाबदारी सोपविली आहे. विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे यांच्या शिफारशीनुसार यश यांची शहराध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.

पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यार्थी शहराध्यक्षपदी यश दत्ता साने यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी नियुक्तीचे पत्र दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नगरसेवक दत्ताकाका साने यांचे यश चिरंजीव आहेत. पक्षाने यश यांच्यावर विद्यार्थी संघटनेची जबाबदारी सोपविली आहे. विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे यांच्या शिफारशीनुसार यश यांची शहराध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.

देशाचे नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माझ्यावर मोठा विश्वास टाकला आहे. त्यांचा मी मनापासून आभारी आहे. खासदार डॉ. अमोल कोल्हे, शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी आमदार विलास लांडे, पालिकेचे विरोधी पक्षनेते राजू मिसाळ शहरातील नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली मी पक्षाचे प्रामाणिकपणे काम करणार आहे. शहरात विद्यार्थी संघटन वाढविणार आहे. काकांच्या पावलावर पाऊल ठेवणे एकनिष्ठेने पक्षाचे काम करणार असल्याचे यश साने यांनी नियुक्तीनंतर सांगितले.