व्याजाने घेतलेले पैसे परत केल्यानंतरही धमकावले ; गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाकडून दोघांना अटक

तक्रारदार व्यावसायिक आहेत. बालेवाडी परिसरात राहण्यास आहेत. त्यांना व्यवसाय करण्यासाठी पैशांची आवश्यकता होती. त्यामुळे त्यांनी नाना वाळके याच्याकडून व्यवसायासाठी ३ कोटी ५० हजार रुपये व्याजाने घेतले होते. या बदल्यात त्यांनी अनिकेत हजारे याच्या बँक अकाउंटवर ३ कोटी २ लाख २७ हजार रुपये टाकले होते. तर, २ कोटी ७ लाख ७३ हजार रुपये रोख स्वरूपात दिले होते.

    पुणे : औधमधील आणखी एक सावकारी प्रकरण पुणे पोलिसांनी उघड केले असून, साडे तीन कोटी रुपये व्याजाने घेतल्यानंतर त्याबदल्यात ५ कोटी १० लाख दिल्यानंतर देखील आणखी पैशांची मागणी करत गाड्यांचे आर.सी.बुक तसेच प्रॉमिसरी नोट जबरदस्तीने लिहून घेत धमकावणाऱ्या सावकारांना गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक दोनने अटक केली आहे.रामदास उर्फ नाना गोपीनाथ वाळके (वय ३९, रा. औंध) व अनिकेत रमेश हजारे (वय ३८, रा. दापोडी) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याबाबत ३५ वर्षीय व्यवसायिकांनी चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. हा प्रकार २०१५ ते २०२१ या कालावधीत घडला आहे.

    तक्रारदार व्यावसायिक आहेत. बालेवाडी परिसरात राहण्यास आहेत. त्यांना व्यवसाय करण्यासाठी पैशांची आवश्यकता होती. त्यामुळे त्यांनी नाना वाळके याच्याकडून व्यवसायासाठी ३ कोटी ५० हजार रुपये व्याजाने घेतले होते. या बदल्यात त्यांनी अनिकेत हजारे याच्या बँक अकाउंटवर ३ कोटी २ लाख २७ हजार रुपये टाकले होते. तर, २ कोटी ७ लाख ७३ हजार रुपये रोख स्वरूपात दिले होते. ऑनलाईनद्वारे व रोकड असे एकूण तक्रारदारांनी एकूण ५ कोटी १० लाख रुपये परत केले होते. तरीही या आरोपींनी त्यांच्याकडे असणाऱ्या गाड्यांचे आर.सी.बुक, चेक घेतले होते. तसेच त्यांच्याकडून बळजबरीने प्रॉमिसरी नोट लिहून घेतली होती. तर, त्यांना ४ कोटी ७५ लाखांची आणखी मागणी करण्यात येत होती. त्यांना पैसे देऊन विषय संपव. अन्यथा अनिकेत हा इतर लोकांना एकत्रित आणून तुझ्याविरोधात दहा ते पंधरा खोट्या तक्रारी दाखल करेल. तसेच, तुझा गेम करायला देखील तो कमी करणार नाही, अशी धमकी देखील दिली होती. त्यानंतर त्यांनी गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक दोनकडे तक्रार दिली होती. त्याचा तपास पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे हे करत होते. यावेळी हा प्रकार समोर आला. त्यानुसार पोलीसांनी गुन्हा दाखल करत या दोघांना अटक केली आहे.ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे, पथकातील विजय गुरव, शैलेश सुर्वे, विनोद साळुंखे, अमोल पिलाने व त्यांच्या पथकाने केली आहे.