वायसीएम रूग्णालयातील बाऊन्सरला मुदतवाढ

कोरोना प्रादूर्भावामुळे महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रूग्णालयात कोरोना रूग्ण दाखल होण्याचे प्रमाण गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, रूग्णालयात रूग्णांच्या उपचारावरून नातेवाईकांकडून अनेकदा तणावाचे वातावरण निर्माण करण्यात येते.

    पिंपरी : पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रूग्णालयात नियुक्त करण्यात आलेल्या दहा बाऊन्सरला सहा महिने कालावधीकरिता मुदतवाढ देण्यात येणार आहे.

    कोरोना प्रादूर्भावामुळे महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रूग्णालयात कोरोना रूग्ण दाखल होण्याचे प्रमाण गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, रूग्णालयात रूग्णांच्या उपचारावरून नातेवाईकांकडून अनेकदा तणावाचे वातावरण निर्माण करण्यात येते. त्यामुळे डॉक्टर, परिचारीका आणि इतर कर्मचाऱ्यांचे मनोबल कमी होत असून वैद्यकीय सेवा देण्यास अडचणी निर्माण होतात. त्यामुळे ३१ मार्च २०२१ रोजीच्या ठरावानुसार तीन महिन्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात के. के. मॅनेजमेंट अ‍ॅण्ड फॅसिलीटी सव्र्हीसेस यांच्यामार्फत १० बाऊन्सर वायसीएम रूग्णालयात नियुक्त करण्यात आले. या कर्मचाऱ्यांचा कामकाज कालावधी ३० जून २०२१ रोजी संपुष्टात येत आहे. या संस्थेचे कामकाज समाधानकारक असल्याने कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता के. के. मॅनेजमेंट यांना सहा महिने कालावधीकरिता मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.