१२५ नगरेसवकांच्या आरोग्य विम्याला मुदतवाढ

महापालिकेत नगरसेवकांचे संख्याबळ १२८ आहे. तऱ ५ स्विकृत सदस्य असे एकूण १३३ नगरसेवक आहेत. या १३३ नगरसेवक आणि त्यांच्या कुटूंबियांसाठी महापालिकेतर्फे आरोग्य विमा योजना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, १३३ नगरसेवकांपैकी आठ नगरसेवकांनी आरोग्य विमा योजनेची सवलत स्विकारण्यास नकार दर्शविला आहे.

    पिंपरी : पिंपरी – चिंचवड महापालिकेतील १२५ नगरसेवकांसाठी वार्षिक पाच लाख रूपयांची आरोग्य विमा योजना राबविण्यात येते. या विम्याची मुदत १८ डिसेंबर २०२१ रोजी संपुष्टात आली आहे. फेब्रुवारी २०२२ मध्ये महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. त्यामुळे सध्या सुरू असलेली आरोग्य विमा योजना २८ फेब्रुवारी २०२२ पर्यंत नुतनीकरण करण्यात येणार आहे. या ७२ दिवसांच्या नुतनीकरणासाठी १५ लाख २४ हजार रूपये खर्च होणार आहे. स्थायी समितीने त्यास मंजूरी दिली.

    महापालिकेत नगरसेवकांचे संख्याबळ १२८ आहे. तऱ ५ स्विकृत सदस्य असे एकूण १३३ नगरसेवक आहेत. या १३३ नगरसेवक आणि त्यांच्या कुटूंबियांसाठी महापालिकेतर्फे आरोग्य विमा योजना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, १३३ नगरसेवकांपैकी आठ नगरसेवकांनी आरोग्य विमा योजनेची सवलत स्विकारण्यास नकार दर्शविला आहे. त्यामुळे १२५ नगरसेवक आणि त्यांच्या कुटूंबियांसाठी पाच लाखांपर्यंत आरोग्य विमा योजना लागू करण्यात येतो. हा विमा नगरसेवक दाम्पत्य आणि त्यांच्या २१ वर्षापर्यंतच्या दोन अपत्यांसाठी लागू आहे.

    दरवर्षी या आरोग्य विमा योजनेचे नुतनीकरण करण्यात येते. या विम्याची मुदत १८ डिसेंबर २०२१ रोजी संपुष्टात येत आहे. पेâब्रुवारी २०२२ मध्ये महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. त्यामुळे सध्या सुरू असलेली आरोगय विमा योजना २८ फेब्रुवारी २०२२ पर्यंत नुतनीकरण करणे आवश्यक आहे. त्यानुसार, १९ डिसेंबर २०२१ ते २८ फेब्रुवारी २०२२ या ७२ दिवसांच्या कालावधीकरिता आरोग्य विमा योजना कार्यान्वित करण्यात येणार आहे. के. एम. दस्तुर रिइन्शुरन्स यांच्यामार्फत ओरीएन्टल इन्शुरन्स कंपनीकडून आरोग्य विमा योजना लागू करण्यात आली आहे. नुतनीकरणासाठी विमा कंपनीने जीएसटीसह १५ लाख २४ हजार खर्च येईल, असे कळवले आहे. त्यानुसार, ७२ दिवसांच्या नुतनीकरणासाठी १५ लाख २४ रूपये ओरीएन्टल इन्शुरन्स कंपनीला देण्यात येणार आहे. स्थायी समितीने आज त्यास मंजूरी दिली.