बारामतीतील नामांकित डाॅ. व्यंकटेश पटाले यांचे निधन

लंडन विद्यापीठाची एफआरसीएस ही जगात सर्वोच्च समजली जाणारी पदवी प्राप्त करून परत स्वदेशी आपल्या लोकांसाठी आपला उपयोग व्हावा, या उद्देशाने कार्यरत झाले.

    बारामती / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : बारामतीमध्ये ५५ वर्ष “कर्मे ईशु भजावा” या ध्येयाने बारामतीतील गोरगरीब रुग्णांची सेवा करणारे प्रतिथयश ‌वैद्यकीय तज्ञ डॉ. व्यंकटेश पटोले (वय ९०) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.

    ते हैद्राराबादच्या उस्मानिया ह्या नामांकित विद्यापीठाचे पदवीधर होते. नंतर लंडन विद्यापीठाची एफआरसीएस ही जगात सर्वोच्च समजली जाणारी पदवी प्राप्त करून परत स्वदेशी आपल्या लोकांसाठी आपला उपयोग व्हावा, या उद्देशाने कार्यरत झाले. योगायोगाने मोहनराव निरगुडे यांनी त्यांना “बारामतीच्या जनतेला तुझी गरज आहे, तर तू इथेच ये” असे डॉ. पटोले यांना सुचवले. त्यानुसार डॉ. पटोले यांनी १५ ऑगस्ट १९७५ बारामतीमध्ये वैद्यकीय सेवेस सुरुवात केली. त्यापूर्वी बारामती येथील सरकारी दवाखान्यात ही पत्नी विद्या पटोले यांना मदत व्हावी, म्हणून वेळोवेळी सहाय्यक होऊन अनेक विनामूल्य व सेवाभावी वृत्तीने शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडल्या.

    डॉ. पटोले यांच्या मृत्यू पश्चात पत्नी डाॅ. विद्याताई पटाले, मुलगा डाॅ.रणजीत, स्नुषा डाॅ. कल्पना व दोन कन्या डाॅ. वैशाली (अमेरिका) व डाॅ. अनुपमा (ऑस्ट्रलिया) असा परिवार आहे.