शेतकऱ्यांनो शेतीला द्या आता ‘जिवाणूंचा’आधार

जमीन सजीव करण्यासाठी नत्र, स्फुरद व पालाश उपलब्ध करून देणारे जिवाणू संवर्धनाचा वापर,सूक्ष्म अन्नद्रव्ये मिळवून देणे साठी झिंक, सिलिकॉन, लोह व गंधक उपलब्ध करून देणारे जिवाणूंचा वापर केल्यास ऊस पिकाचे नक्कीच उत्पादन वाढले शिवाय राहणार नाही. मातीतील सेंद्रिय कर्ब वाढविण्यासाठी हिरवळीची खते, उसाचा पाला पाचोळा जाळून न टाकता तो मातीत गाढल्यास त्या पासून आपल्याला सेंद्रिय कर्ब वाढण्यास मदत होईल.

    दौंड: डीबीटी बायोटेक किसान हब प्रकल्प अंतर्गत नानगाव येथे प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. जैवप्राद्योगिकी विभाग, विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय, नवी दिल्ली, भारत सरकार पुरस्कृत डीबीटी बायोटेक किसान हब हा बहुध्येशिय प्रकल्प ऍग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामतीमार्फत सन २०१९-२० पासून राबविला जात आहे. या प्रकल्प अंतर्गत पुणे जिल्ह्यातील बारामती, दौंड व इंदापूर या तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी बांधवांसाठी शेतकरी प्रशिक्षणे, किसान गोष्टी, चर्चा सत्रे, शिवार फेरी,शेतकरी- शास्त्रज्ञ चर्चा सत्रे व शास्त्रज्ञ प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. आडसाली व सुरू सीझनमध्ये प्रत्येकी २०० असे एकूण ४०० ऊस उत्पादकांना जमीन सुधारणा, उत्पादन वाढ यासाठी जैविक निविष्ठा पुरवल्या जातात. सोमवारी (दि.२२) नानगाव(ता.दौंड) येथे ह्या प्रकल्पांतर्गत शेतकरी प्रशिक्षण घेण्यात आले होते. डीबीटी प्रकल्प सहाय्यक अनिल काळोखे यांनी जमीन स्वास्थ्य व ऊस उत्पादन वाढ यामध्ये जिवाणूंचे महत्व पटवून दिले. जिवाणूंचा योग्य वेळी कार्यक्षम वापर व रासायनिक खते गरजेनुसार वापरण्यासाठी नियोजन या बद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. जिवाणू खतांचे ऊस पीक उत्पादन वाढीत असणारे महत्व त्याच बरोबर जमीन आरोग्य टिकवण्यासाठी करावयाच्या उपाय योजना याविषयी सल्ला दिला.
    – तर ऊस पिकाचे उत्पादन वाढणार
     जमीन सजीव करण्यासाठी नत्र, स्फुरद व पालाश उपलब्ध करून देणारे जिवाणू संवर्धनाचा वापर,सूक्ष्म अन्नद्रव्ये मिळवून देणे साठी झिंक, सिलिकॉन, लोह व गंधक उपलब्ध करून देणारे जिवाणूंचा वापर केल्यास ऊस पिकाचे नक्कीच उत्पादन वाढले शिवाय राहणार नाही. मातीतील सेंद्रिय कर्ब वाढविण्यासाठी हिरवळीची खते, उसाचा पाला पाचोळा जाळून न टाकता तो मातीत गाढल्यास त्या पासून आपल्याला सेंद्रिय कर्ब वाढण्यास मदत होईल. सदर चर्चा सत्राच्या शेवटी सन २०१९-२० वर्षातील डीबीटी बायोटेक प्रकल्प लाभार्थी शेतकरी विजय फराटे यांच्या ऊस क्षेत्रा वरती शिवार फेरी घेण्यात आली. सदर प्रशिक्षणसाठी नानगाव व परिसरातील ३९ ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन आत्माचे तंत्रज्ञान व्यवस्थापक महेश रुपनवर यांनी केले. आभार हातवळण गावचे कृषी मित्र सचिन शिंदे यांनी मानले.