गोहे पाझर तलाव भरल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत

मंचर  :  आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागामध्ये जोरदार पाऊस सुरु असल्याने गोहे पाझर तलाव भरुन वाहत आहे.गतवर्षीपेक्षा एक महिना उशिराने तलाव भरला आहे.
गोहे  येथे तलाव असून गेल्या पाच दिवसांपासून पडत असलेल्या पावसाने  भरुन  सांडव्यावरुन पाणी वाहू लागल्याने नदीपात्रात पाणी वाढले आहे.हुतात्मा बाबू गेनू सागर (डिंभे धरणाच्या)  पायथ्याला घोडनदी पात्रात तलावाचे पाणी येऊन मिळते.घोडनदीपात्रात पाणी  कमी झाले तरी सद्यस्थितीत तलावातून अतिरिक्त पाण्यामुळे घोडनदीपात्रात पाणी वाढले आहे.यांचा फायदा ६० गावांना  होत आहे.गतवर्षी १५ जुलैला पाझर तलाव भरला होता.यावर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्याने त्यासाठी गुरुवार दि.१३ रोजीपर्यंत वाट पहावी लागली असल्याचे सांगण्यात आले.तलाव भरल्याने शेतकè्यांनी आनंद व्यक्त केला आहे.