नवले ब्रिज परिसरात पुन्हा भीषण अपघात ; तीन जणांचा जागीच मृत्यू

नवले ब्रिज जवळील "आय लव्ह नर्हे" येथे एक टेम्पो आणि टवरे कारच्या मध्ये असलेल्या अल्टो कारला टेम्पोने जोरात धडक दिली. यात अल्टो कार या दोन्ही वाहनांच्यामध्ये चेंबली गेली. त्यानंतर टवरे आणि टेम्पोने इतर वाहनांना धडक दिली. यात 5 वाहनांना धडक दिली असून, त्यात ५ जण जखमी झाले आहेत.

    पुणे : अपघात पॉईंट असलेल्या नवले ब्रिज परिसरात पुन्हा भीषण अपघात झाला असून, या विचित्र अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर ४ ते ५ जण जखमी झाले आहेत. घटनास्थळी सिंहगड रोड पोलीस व वाहतूक विभाग दाखल झाला असून, वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

    नवले ब्रिज जवळील “आय लव्ह नर्हे” येथे एक टेम्पो आणि टवरे कारच्या मध्ये असलेल्या अल्टो कारला टेम्पोने जोरात धडक दिली. यात अल्टो कार या दोन्ही वाहनांच्यामध्ये चेंबली गेली. त्यानंतर टवरे आणि टेम्पोने इतर वाहनांना धडक दिली. यात 5 वाहनांना धडक दिली असून, त्यात ५ जण जखमी झाले आहेत. अद्याप मयत व्यकयीची नावे मिळालेली नाहीत. पोलिसांनी जखमींना जवळ असलेल्या रुग्णालयात दाखल केले आहे. तर वाहतूक सुरळीत करण्यास सुरुवात केली आहे. अपघात ग्रस्त वाहने बाजूला काढली जात आहेत.