ओबीसींच्या आरक्षणासाठी पुनर्विचार याचिका दाखल करा; विविध संघटनांची मागणी

    पिंपरी : सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या रीट याचिकेवर न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे देशभरातील स्थानिक स्वराज्य संस्थामधील ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द झाले आहे. ते पूर्ववत राहावे यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करावी, या मागणीसाठी गुरुवारी (दि. २४) पिंपरीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात विविध संस्था, संघटना आणि पक्ष प्रतिनिधींच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

    या आंदोलनात पिंपरी-चिंचवड शहरातील विविध पक्षांचे आजी, माजी नगरसेवक, विविध संस्था संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. ओबीसी संघर्ष समिती, बारा बलुतेदार महासंघ, महाराष्ट्र राज्य प्रजा लोकशाही परिषद, महाराष्ट्र राज्य लोकशाही बचाव समिती, महात्मा फुले समिती परिषद, महाराष्ट्र राज्य विश्वकर्मीय सुतार समाज समन्वय समिती, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक समिती, ओबीसी महासभा महाराष्ट्र प्रदेशभारतीय प्रजा सुराज्य पक्ष, प्रहार संघटना, महाराष्ट्र नाभिक महासंघ, वंचित बहुजन आघाडी, भाजप ओबीसी आघाडी.

    तसेच अखिल महाराष्ट्र विश्वकर्मा सुतार समाज महासंघ पुणे, महाराष्ट्र नाभिक महामंडळ, महाराष्ट्र परीट ( धोबी) सेवा मंडळ, महात्मा फुले मंडळ, श्री विश्वकर्मा सेवा भावी संस्था, श्री विश्वकर्मा वेल फेअर फाऊंडेशन, महाराष्ट्र कुंभार समाज महासंघ, कुंभार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र कुंभार विकास संस्था, सत्य शोधक नागरिक मंच, महाराष्ट्र माळी समाज महासंघ या संस्थांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. या आंदोलनानंतर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.