बोगस एफडीआर प्रकरणी दोषी ठेकेदारावर गुन्हे दाखल करा ; वंचित बहुजन आघाडीचे ‘दे टक्का’ आंदोलन

पिंपरी : बोगस एफडीआर (फिक्स्ड डिपॉझिट रिसीट) आणि बँक हमी देवून महापालिकेची फसवणूक करणा-या ठेकेदारांवर गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीने (गुरुवारी) पालिकेसमोर ‘दे टक्का’ आंदोलन केले. दरम्यान, अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांनी ठेकेदारांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.

वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष देवेंद्र तायडे, महासचिव राहिम सय्यद यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात मोठ्या संख्येने पदाधिकारी सहभागी झाले होते. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध विकासकामांध्ये भ्रष्टाचार होत आहे. निविदा रकमेच्या ३० ते ४० टक्के कमी दराने ठेका घेऊन कामे कशी केली जातात?, महापालिका प्रशासनातील अधिकारी व ठेकेदार यांचे काही संगनमत आहे का? बोगस एफडीआर प्रकरणाची सीबीआय मार्फत चौकशी करावी. अधिकारी व ठेकेदार यांची नार्को टेस्ट करून त्यांची ईडी मार्फत चौकशी करण्यात यावी. अशा विविध मागण्यासाठी ‘दे टक्का’ आंदोलन करण्यात आले