ज्यादा पावाच्या पैशावरून पाच मित्रांना मॉलमधील कर्मचाऱ्यांकडून मारहाण

नाष्टा करून झाल्यानंतर ज्यादा पावांच्या पैशांवरून ढोरे आणि आरोपी यांच्यात वाद झाला. यावेळी मॉलमधील ७ ते ८ जणांनी ढोरे व त्यांच्या मित्रांना शिवीगाळ करत लोखंडी पाईप, लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. तळेगाव - दाभाडे पोलीस तपास करत आहेत.

    पिंपरी : नाष्टा करून झाल्यानंतर ज्यादा पावाच्या पैशांवरून पाच मित्रांना फूड मॉलमधील सात ते आठ जणांनी शिवीगाळ करत लाकडी दांडक्याने, लोखंडी पाईपने मारहाण केली. ही घटना उर्से टोल नाक्याजवळील फूड मॉलमध्ये रविवारी सकाळी पावणेसात वाजता घडली.

    स्वप्निल बाळासाहेब ढोरे (वय २८, रा. यशवंतनगर, तळेगाव-दाभाडे) यांनी तळेगाव-दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फूड मॉलमधील कॅशियर, कामगार, आचारी अशा ७ ते ८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी ढोरे आणि त्यांचे मित्र अक्षय लोणारी, जयदिप पिल्ले, रोहन बालवडकर, अनिरूध्द पाडाळे हे रविवारी सकाळी उर्से टोलनाका येथील फूड मॉलमध्ये नाष्टा करण्यासाठी थांबले होते. नाष्टा करून झाल्यानंतर ज्यादा पावांच्या पैशांवरून ढोरे आणि आरोपी यांच्यात वाद झाला. यावेळी मॉलमधील ७ ते ८ जणांनी ढोरे व त्यांच्या मित्रांना शिवीगाळ करत लोखंडी पाईप, लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. तळेगाव – दाभाडे पोलीस तपास करत आहेत.