महावितरणच्या कर्मचाऱ्याला भाजपच्या माजी नगरसेवकाकडून मारहाण

थकीत वीजबिल असल्याने वीज तोडण्यासाठी आलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्याला भाजपच्या माजी नगरसेवकाने मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी भाजपचे माजी नगरसेवक धनंजय जाधव (Dhananjay Jadhav) यांच्यासह दोघांवर दत्तवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महावितरणच्या वरिष्ठ तंत्रज्ञाने तक्रार दिली आहे.

    पुणे : थकीत वीजबिल असल्याने वीज तोडण्यासाठी आलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्याला भाजपच्या माजी नगरसेवकाने मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी भाजपचे माजी नगरसेवक धनंजय जाधव (Dhananjay Jadhav) यांच्यासह दोघांवर दत्तवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महावितरणच्या वरिष्ठ तंत्रज्ञाने तक्रार दिली आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे नवी पेठेतील महावितरण कार्यालयात नेमणुकीस आहेत. वीजबिल थकीत असल्याने आंबील ओढा परिसरात वीज बिल वसुली साठी गेले होते. सकाळी 11 वाजेच्या सुमारास ते थकित विजबिलामुळे वीज कनेक्शन कापत असताना धनंजय जाधव त्या ठिकाणी आले. त्याने अश्लील भाषेत शिवीगाळ करत त्यांना मारहाण केली. तसेच ते करत असलेल्या सरकारी कामात अडथळा निर्माण केला. त्यांच्या सहकाऱ्यांना ठार मारण्याची धमकी दिली, असे तक्रारीत म्हटले आहे.