मावळ तालुक्यातील गड-किल्ल्यांसह इतर पर्यटनस्थळे बंद !

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी मावळ तालुक्यात ऐतिहासिक गड, किल्ले, ऐतिहासिक वास्तू, स्मारके, धरणे व पर्यटन स्थळावर फिरण्यासाठी बंदी घातली आहे. तसेच जमावबंदीचे आदेश देखील निर्गमित केले आहेत. या निर्णयामुळे तेथील व्यवसायिकांच्यामध्ये आस्वस्थता पसरली असून त्यांच्या रोजीरोटीवर पुन्हा एकदा कोरोनामुळे गदा आलेली आहे.

    तळेगाव दाभाडे : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी मावळ तालुक्यात ऐतिहासिक गड, किल्ले, ऐतिहासिक वास्तू, स्मारके, धरणे व पर्यटन स्थळावर फिरण्यासाठी बंदी घातली आहे. तसेच जमावबंदीचे आदेश देखील निर्गमित केले आहेत. या निर्णयामुळे तेथील व्यवसायिकांच्यामध्ये आस्वस्थता पसरली असून त्यांच्या रोजीरोटीवर पुन्हा एकदा कोरोनामुळे गदा आलेली आहे.

    पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी याबाबत शासन आदेश जारी केलेला आहे. या आदेशानुसार मावळातील लोणावळ्या जवळील भुशीधरण, घुबडतलाव, तुंगार्ली धरण, राजमाचीपोईंट, मक्कीपोईंट, अमृतांजण ब्रिज, लायन पोईंट आदी ठिकाणी पर्यटकांना येण्यास मनाई करण्यात आलेली आहे. याशिवाय वेहरगाव येथील कार्ला भाजे लेणी, घोरवाडेश्वर लेणी, लोहगड किल्ला तुंग, तिकोना, विसापूर किल्ला पवनाधरण या ठिकाणांचाही आदेशामध्ये समावेश आहे.

    या निर्णयामुळे पर्यटनस्थळाच्या परिसरामध्ये असलेले हॉटेल व्यावसायिक चहा वडापाव टप-याधारक या धार्मिक स्थळावरील प्रसाद, हार, हळद, कुंकू हारतुरे, फुले याचे व्यावसायिक, तसेच रिक्षा, चारचाकी वाहतूकदार यांना आर्थिक फटका बसणार असल्याने त्यांच्यामध्ये अस्वस्थता पसरली आहे.

    गेल्या दोन वर्षापासून कोरोना संक्रमणाचा प्रदुर्भाव होऊन नये म्हणून शासनाने धार्मिक व पर्यटनस्थळे यावर जमावबंदी तसेच पर्यटन यावर बंदी घातली होती. नुकतेच काहीकाळ हि बंदी उठून व्यवसाय वाढीकडे वाटचाल करत असताना शासनाने पुन्हा कोरोनामुळे बंदी घातल्याने हे व्यावसायिक चिंताग्रस्त झाले असून, उत्पन्न व रोजीरोटीसाठी पर्यायी व्यवसाय निर्माण करण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय उरला नसल्याचे व्यावसायिक सांगत आहेत.