सिंहगड रस्ता, कोंढवा परिसरातील चार बंद फ्लॅट फोडले

अभिनव कॉलेजजवळ शिवसाधना अपार्टमेंट येथे राहतात. दरम्यान, त्यांचा फ्लॅट हा बंद होता. त्यावेळी चोरट्यांनी त्यांच्या फ्लॅटचे कुलूप उचकटून आत प्रवेश केला व घरातील १ लाख ६० हजार रुपयांचा एवेज चोरून नेला.

    पुणे : शहरात घरफोड्यांचे सत्र सुरूच असून, चोरट्यांनी सिंहगड रोड परिसरात तीन आणि कोंढव्यात एक बंद फ्लॅट फोडून लाखोंचा ऐवज चोरून नेला आहे. काही केल्या या घटना पोलीसांना थांबवता येत नसल्याचे दिसत असून, पुणेकरांची पाठ हे चोरटे सोडत नसल्याचे वास्तव आहे.

    याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात संदीप जोशी (वय ४५) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार जोशी हे नर्हे येथील अभिनव कॉलेजजवळ शिवसाधना अपार्टमेंट येथे राहतात. दरम्यान, त्यांचा फ्लॅट हा बंद होता. त्यावेळी चोरट्यांनी त्यांच्या फ्लॅटचे कुलूप उचकटून आत प्रवेश केला व घरातील १ लाख ६० हजार रुपयांचा एवेज चोरून नेला. तर, त्यांच्यासोबतच पाठिमागील बाजूस असणाऱ्या ओंकार सोसायटीत देखील दोन फ्लॅट फोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यातून नेमका काय चोरीला गेले हे समजू शकलेले नाही. अधिक तपास सिंहगड रोड पोलीस करत हेत.

    तर, दुसरा प्रकार हा कोंढवा भागात घडला असून, चोरट्यांनी येथून सव्वा तीन लाखांचा ऐवज चोरून नेला आहे. याप्रकरणी जयेश सोळंखी (वय ४७) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्यांविरोधात कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार हे उंड्री परिसरातील श्रृष्टी आंगण बंगलो सोसायटीत राहतात. यादरम्यान, तक्रारदार वरच्या मजल्यावर झोपल्यानंतर अज्ञात चोरट्यांनी तळमजल्यावरील खिडकीचे ग्रील कापून त्याद्वारे आत प्रवेश केला. तसेच बेडरूममधील कपाटामधून ३ लाख ३२ हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. अधिक तपास कोंढवा पोलीस करत आहेत.