पुण्यात पिकअप आणि टेम्पोचा भीषण अपघात, चार जणांचा मृत्यू

जुन्नर : पुण्यातील जुन्नरमध्ये पिकअप आणि टेम्पोची भीषण धडक ( Pune pickup and tempo accident) झाल्यामुळे ४ जणांचा मृत्यू        ( Four killed ) झाला असल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना आज पहाटेच्या सुमारास घडली. तसेच कल्याण-नगर महामार्गावर (On the Kalyan-Nagar highway)  वडगाव आनंद इथे पिकअप आणि टेम्पोची भीषण धडक झाली.

मिळालेल्या माहितीनुसार, दांगटमळ्याजवळ आज पहाटे टाटाच्या जितो आणि आयशर ट्रकमध्ये समोरा-समोर धडक झाली. जितो टेम्पो मुंबईकडून आळेफाटा बाजूस येत होता तर आयशर टेम्पो आळेफाटा बाजुकडून कल्याण दिशेने चालला होता. याचदरम्यान, दोन्ही वाहनांची धडक झाली असून जितोमधील दोघांचा घटनास्थळी जागीच मृत्यू झाला आहे. तर एकाचा आळेफाटा येथील रुग्णालयात तसेच एकाचा रुग्णालयात घेऊन जाताना मृत्यू झाला आहे.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन या घटनेची तपासणी केली. त्यानंतर पोलिसांनी चार जणांचे मृतदेह ताब्यात घेतले असून ते शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. तसेच पोलिसांची पुढील चौकशी चालू आहे.