पुणे जिल्हा बँकेसाठी दौङ भाजपकडून चार जणांचे उमेदवारी अर्ज दाखल

'अ' प्रवर्गातून भाजप किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष अभिमन्यू गिरमकर यांनी अर्ज दाखल केला आहे. खामगाव ग्रामपंचायत माजी उपसरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सुखदेव चोरमले व दिनेश गडधे यांनी इतर मागासवर्ग,वि.जा., भ.ज. वि.मा. प्रवर्गासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले आहे.

    राहू :  पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी दौंड तालुका भारतीय जनता पार्टीकङुन चार जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे निवडणुकीची रंगत वाढली आहे.दौंड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने यापूर्वी जिल्हा बँकेसाठी पाच जणांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले असून अखेरच्या दिवशी भारतीय जनता पार्टी कडून आमदार राहुल कुल यांच्या मार्गदर्शनाखाली चार जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहे.

    यामध्ये ‘अ’ प्रवर्गातून भाजप किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष अभिमन्यू गिरमकर यांनी अर्ज दाखल केला आहे. खामगाव ग्रामपंचायत माजी उपसरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सुखदेव चोरमले व दिनेश गडधे यांनी इतर मागासवर्ग,वि.जा., भ.ज. वि.मा. प्रवर्गासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले आहे.महिला राखीव प्रवर्गातून जयश्री भागवत यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला .यावेळी भीमा पाटस कारखान्याचे माजी उपाध्यक्ष आनंद थोरात,भाजपाचे तालुका अध्यक्ष माऊली ताकवणे, प्रशांत गिरमकर आधी सह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.