संग्रहित
संग्रहित

आर्थिक नुकसान झाल्यानं हे कुटुंब अडचणीच्या काळातून जात होतं. त्यातूनच त्यांनी हे गंभीर पाऊल उचलल्याचं सांगण्यात येतंय. या प्रकरणात मुंढवा पोलीस अधिक तपास करीत आहेत. 

    पुणे – मुंढवा परिसरात एकाच कुटुंबातील चौघांनी (family suicide) आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विष घेूउन चौघांनीही (4 died) आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. मृतांमध्ये पती, पत्नी  आणि  त्यांच्या दोन मुलांना समावेश आहे. शेजारी राहणाऱ्यांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर त्यांनी याची माहिती पुणे पोलिसांना (Pune police) दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहचल्याची माहिती आहे.

    आर्थिक अडचणीतून आत्महत्या?

    आर्थिक नुकसान झाल्यानं हे कुटुंब अडचणीच्या काळातून जात होतं. त्यातूनच त्यांनी हे गंभीर पाऊल उचलल्याचं सांगण्यात येतंय. या प्रकरणात मुंढवा पोलीस अधिक तपास करीत आहेत.

    या बातमीची अधिक माहिती मिळताच सविस्तर बातमी देण्यात येईल.