मागच्या अनुभवातून पुणेकर झाले शहाणे… बावधन टेकडीवर ‘गवा’ परतण्यासाठी वनविभागाचे शर्थीचे प्रयत्न

गव्याला रेस्क्यू करण्यासाठी प्रशासन, वन विभागाचे कर्मचारी, पोलीस हे घटनास्थळी उपस्थित झाले. यावेळी अतिशय काळजीपूर्वक रेस्क्यू करण्याचे काम सुरू करुन नागरिकांची गर्दी होणार नाही, याचीही काळजी प्रशासनाने घेतली. कोथरुडमध्ये रेस्क्यू करत असताना गव्याचा मृत्यू झाला होता. त्यामुळे खबरदारी म्हणून गव्याला पकडण्या ऐवजी त्याच्या मार्गाने परत जाऊ देणे हेच योग्य ठरेल, असे उपवनसंरक्षक राहुल पाटील यांनी स्पष्ट केले होते.

पुणे: तेरा दिवसांनंतर पुन्हा एकदा पुण्यातील बावधन परिसरातील एचसीएमआरएल पाषाण तलावाजवळ असलेल्या भिंतीजवळ गवा आढळून आला होता. मात्र मागील अनुभव बघता यावेळी गव्याला योग्यपद्धतीने हाताळत पुन्हा सुखरूप परत पाठवण्यासाठी वन विभाच्या अधिकाऱ्यांकडून प्रयत्न केले जात आहेत. गवा महामार्गावर येऊ नये, यासाठी विशेष दक्षता घेतली जात होती. अखेर गव्याला परत पाठविण्यात वन विभागातील अधिकाऱ्यांना यश येत आहे. पुणेकरांनी अनुभवतातून शहाणपणा शिकला अन् यावेळी गवा सुखरुप जंगलात परतेल असे दिसून येतेय. गव्याला रेस्क्यू करण्यासाठी प्रशासन, वन विभागाचे कर्मचारी, पोलीस हे घटनास्थळी उपस्थित झाले. यावेळी अतिशय काळजीपूर्वक रेस्क्यू करण्याचे काम सुरू करुन नागरिकांची गर्दी होणार नाही, याचीही काळजी प्रशासनाने घेतली. कोथरुडमध्ये रेस्क्यू करत असताना गव्याचा मृत्यू झाला होता. त्यामुळे खबरदारी म्हणून गव्याला पकडण्या ऐवजी त्याच्या मार्गाने परत जाऊ देणे हेच योग्य ठरेल, असे उपवनसंरक्षक राहुल पाटील यांनी स्पष्ट केले होते.
\

सुखरुप परतण्यसााठी शर्थीचे प्रयत्न

पुन्हा गवा आल्यानंतर प्रशासनाची आणि रेस्क्यू टीमची मोठी त्रेधातिरपीट उडाली. या गव्याला सुरक्षितपणे रेस्क्यू करण्यात प्रशासनाला यश मिळालंय. परिसराची संपूर्णपणे पाहणी करून गव्याला एचईएमआरएल च्या कंपाउंडमध्ये असलेल्या जंगलामध्ये परत पाठवण्यासाठी आखणी करण्यात आली. त्यानंतर, महामार्ग लगत संरक्षण करण्यासाठी अतिरिक्त पोलीस दल मागवण्यात आले आहे. पोलीस दलाच्या अतिरिक्त तुकड्या दाखल झाल्या, अखेर महामार्गालगत तात्पुरते संरक्षण तयार करून त्याला पुन्हा त्याच्या आदिवासामध्ये सोडण्यात सर्वच यंत्रणांना यश आले. गवा टेकडीकडे परतला असून लवकरच जंगलात निघून जाईल. त्यासाठी, शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.