उद्यापासून पुणेकर आता पुन्हा चारच्या आत घरात! ; शहरातील निर्बंधांच्या वेळेत बदल, सायंकाळी पाचनंतर संचारबंदी

-दुकाने दुपारी चारपर्यंतच खुली ठेवण्याची परवानगी

  पुणे : काेराेना परिस्थिती नियंत्रणासाठी महापालिकेने लागू केलेल्या निर्बंधात साेमवारपासून ( ता. २८ ) बदल केले आहे. सर्व दुकाने दुपारी चारपर्यंतच खुली ठेवण्याची परवानगी देेण्यात आली आहे. तर सायंकाळ पाचनंतर संचारबंदी लागू राहणार आहे. तसेच शनिवार आणि रविवारी सुरू असलेला लाॅकडाऊन कायम ठेवण्यात आला आहे.

  शुक्रवारी राज्य सरकारने संपुर्ण राज्यांत लेवल तीन जाहीर केली आहे. त्यानुसार पुणे महापािलका आयुक्त विक्रम कुमार यांनी नव्याने आदेश जारी केले आहे. शुक्रवारी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्याची काेराेना आढावा बैठक पार पडली. या बैठकीत आहे तेच निर्बंध पुढील आठवड्यात लागु ठेवण्याचा निर्णय झाला हाेता, परंतु राज्य सरकारच्या नवीन आदेशानुसार आयुक्त विक्रम कुमार यांनी शनिवारी आदेश जारी केले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी साेमवारपासून केली जाणार आहे.

  आदेशानुसार, अत्यावश्यक सेवेत येेणारी सर्व प्रकारची दुकाने ही आठवड्यातील सर्व दिवस दुपारी चार पर्यंत खुली ठेवता येणार आहेत. तर अत्यावश्यक सेवा वगळून इतर दुकाने ही साेमवार ते शुक्रवार दुपारी चार वाजेपर्यंत खुली ठेवली जातील. तर शनिवार आणि रविवारी ही दुकाने बंद ठेवली जातील. रेस्टाॅरंट, बार, फुड काेर्ट हे साेमवार ते शुक्रवार दुपारी चार पर्यंत आसन क्षमतेच्या पन्नास टक्के क्षमतेने खुली राहतील. शनिवार आणि रविवार रात्री अकरापर्यंत पार्सल सेवा सुरू ठेवता येणार आहे.

  * माॅल , नाट्यगृह, चित्रपटगृह पुर्ण बंद
  * लाेकल रेल्वेचा प्रवास फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांकरीताच
  * मैदाने, उद्याने, आऊट डाेअर स्पाेर्टस पहाटे पाच ते सकाळी नऊ यावेळेतच सुरू राहणार
  * व्यायामशाळा , सलून, स्पा क्षमतेच्या पन्नास टक्के दुपारी चार पर्यंत सुरू
  * धार्मिक, सामाजिक आणि मनाेरंजनाच्या कार्यक्रमांना फक्त ५०लाेकांना परवानगी, दुपारी चारपर्यंत वेळेची मुदत
  * धार्मिक स्थळे पुर्ण बंद, केवळ दैनदिंन पुजेला परवानगी
  * लग्न समारंभास ५० आणि अंत्यविधी, दशक्रीया विधीसाठी केवळ २० व्यक्तींची उपस्थिती
  * सांयकाळी पाचपर्यंत पाच व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई आणि सांयकाळी पाचनंतर संचारबंदी
  * शाळा, महाविद्यालये, काेचिंग क्लासेस १५ जुलैपर्यंत बंद , अाॅनलाईन शिक्षण सुरू
  * मद्यविक्रीची दुकाने साेमवार ते शुक्रवार दुपारी चारपर्यंत सुरू राहतील, शनिवार आणि रविवार हाेमडिलिव्हरी सुरू