कामगारांचे पैसे न दिल्यामुळे कंत्राटदाराला टोळक्याची मारहाण ; मगरपट्टयातील घटना

तीन दुचाकीवर आलेल्या सहाजणांनी त्यांना हाताने मारहाण केली. आरोपीतील एकाने त्यांना घरातून पैसे मागून घे, नाहीतर तुला मारून टाकू, अशी धमकी दिली. त्यावेळी बांधकाम व्यावसायिकाने फसविले असल्यामुळे पैसे नसल्याचे जयसिंग यांनी आरोपींना सांगितले. त्यानंतर आरोपींनी त्यांना मगरपट्टा पुलाखाली नेऊन मारहाण केली आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सागर पोमण तपास करीत आहेत.

    पुणे : कामगारांचे पैसे न दिल्यामुळे कंत्राटराला मारहाण करून शिवीगाळ केल्याची घटना घडली आहे. सहाजणांच्या टोळक्याने ही मारहाण केली आहे. ही घटना दोन दिवसांपूर्वी रात्री नऊच्या सुमारास पुण्यातील मगरपट्टा पुलाखाली घडली.

    याप्रकरणी जयसिंग राठोड (४०, सोनार आळी, हडपसर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. जयसिंग राठोड बांधकाम कंत्राटदार आहेत. दोन दिवसांपूर्वी रात्री पावणेनऊच्या सुमारास ते मगरपट्टा परिसरात चहा पित होते.त्यावेळी तीन दुचाकीवर आलेल्या सहाजणांनी त्यांना हाताने मारहाण केली. आरोपीतील एकाने त्यांना घरातून पैसे मागून घे, नाहीतर तुला मारून टाकू, अशी धमकी दिली. त्यावेळी बांधकाम व्यावसायिकाने फसविले असल्यामुळे पैसे नसल्याचे जयसिंग यांनी आरोपींना सांगितले. त्यानंतर आरोपींनी त्यांना मगरपट्टा पुलाखाली नेऊन मारहाण केली आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सागर पोमण तपास करीत आहेत.