केडगाव व यवत पोलिसांकडून दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेली टोळी जेरबंद !

आरोपींच्या अंगझडतीमध्ये ४ माबाईल,१ कटावणी,स्क्रू ड्रायव्हर,मिरची पुड,८ फुट लांबीची सुती दोरी, एक चाकू मिळून आला आहे.तसेच त्याचेकडील पांढरे रंगाची होन्डा सीटी कारची झडती घेता त्यामध्ये दोन लोखंडी कटावणी,एक लोखंडी कटर,काळे रंगाचे दोन बुरखे,दोन नंबर प्लेट एम.एच ०४ बी.डब्यु ७९३२ असा मुददेमालसह दरोडयाचे तयारीत असताना केडगाव ता.दौंड जि.पुणे येथे मिळून आले आहेत.

    पारगाव  : यवत पोलीस स्टेशन हद्दीत सरकारी गाडीने पोलीस कर्मचारी नाईट राउंड पेट्रोलिंग डयुटी करत असताना (ता.२९) रोजी रात्री ३.३० वाजण्याच्या सुमारास केडगाव गावच्या हद्दी बाजारपेठ परीसरात एक पांढऱ्या रंगाची नंबर प्लेट नसलेली कार संशयरीत्या उभी असलेली दिसून आली.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,सदर गाडीच्या जवळ आम्ही गेलो असता गाडीत बसलेले ५ इसम आमची चाहुल लागताच पळून जावू लागल्याने आम्ही सदर इसमाचा पाठलाग करून ५ पैकी ४ इसमांना पकडले व १ इसम हा अंधाराचा फायदा घेवुन पसार झाला आहे.तसेच त्या ४ इसमांचे नाव व पत्ता (१ ) आरीफ फकीर महंमद वय –२८ वर्षे , रा.नॅशल सोसायटी सहशसरीफ नगर अहमदनगर ,(२ ) कमलेष बाळासाहेब दाणे वय २१ वर्षे रा.नारायण ढेह रा.अहमदनगर,(३ ) सलमान सादीक शेख रा.मोमीन पुरा बिड,( ४ ) सलिम दगडु पठाण वय २८ वर्षे , रा . मुकुद नगर अहमनगर व पळुन गेलेले इसमाचे नाव( ५ ) सोहेल मोमीन रा.बिड अशी आहेत.

    आरोपींच्या अंगझडतीमध्ये ४ माबाईल,१ कटावणी,स्क्रू ड्रायव्हर,मिरची पुड,८ फुट लांबीची सुती दोरी, एक चाकू मिळून आला आहे.तसेच त्याचेकडील पांढरे रंगाची होन्डा सीटी कारची झडती घेता त्यामध्ये दोन लोखंडी कटावणी,एक लोखंडी कटर,काळे रंगाचे दोन बुरखे,दोन नंबर प्लेट एम.एच ०४ बी.डब्यु ७९३२ असा मुददेमालसह दरोडयाचे तयारीत असताना केडगाव ता.दौंड जि.पुणे येथे मिळून आले आहेत.

    ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख,अप्पर पोलीस अधीक्षक मिलींद मोहीते,उपविभागीय पोलीस अधीकारी राहुल धस यांच्या मार्गर्शनाखाली पोलीस निरीक्षक भाउसाहेब पाटील,पोसई गंपले,पो.ना.आर.आर.गोसावी,पो.ना.डी.एस.बनसोडे,पो.ना.बी.व्ही चोरमले,पो.ना.काळे,पो.कॉ.व्ही.एल.जाधव,पो.कॉ.टी.ए.करे,पो.कॉ.भोसले,पो.कॉ.गडधे,होमगार्ड खंडाळे,होमगार्ड गायकवाड यांनी केली असुन गुन्हयाचा पुढील अधिक तपास पोलीस उप निरीक्षक पदमराज गंपले हे करीत आहेत.