ग्रामीण भागात घरफोडी  करणारी टोळी गजाआड

सीसीटीव्हीमध्ये या टोळीचा पर्दाफाश झाला. ही टोळी दुपारी बंद घरांची रेकी करत असे. ही टोळी कटोनि आणि  हत्यारा सोबत  घुसून  घरफोडी  करत होती. आलेल्या पैशातून ही टोळी कुटुंबीयांसाठी स्वतःसाठी महागडे कपडे महागड्या गाड्या खरेदी करत असे.

    पुणे : पुणे जिल्ह्यातील पौंड तसेच मावळ परिसरात घरफोडी  करून दरोडा घालणारी टोळी गजाआड करण्यात पुणे पोलिसांना यश आले आहे. कंजारभाट समाजाच्या  टोळी मे घरफोड्या करून हैदोस घातला होता. अखेर पिंपरी-चिंचवड शहरातील गुन्हे शाखेच्या विभागाने या टोळीला अटक करून पिंपरी  – चिंचवड पोलिसांनी जवळपास  १८ लाख  रुपयाचा  मुद्देमाल  जप्त  केला आहे. आता पर्यंत ४८ गुन्हे  उघडकीस आले आहेत.

    सीसीटीव्हीमध्ये या टोळीचा पर्दाफाश झाला. ही टोळी दुपारी बंद घरांची रेकी करत असे. ही टोळी कटोनि आणि  हत्यारा सोबत  घुसून  घरफोडी  करत होती. आलेल्या पैशातून ही टोळी कुटुंबीयांसाठी स्वतःसाठी महागडे कपडे महागड्या गाड्या खरेदी करत असे. पिंपरी चिंचवड पोलिसांनी या टोळीचा पर्दाफाश करून सुद्धा फरार पाच आरोपींचा शोध सुरु आहे.