
आज बालेवाडीच्या श्री शिवछत्रपती क्रिडा संकुलात पुश इंडिया पुश या आगळ्या-वेगळ्या स्पर्धेचे भव्य उद्घाटनन केंद्रीय राज्यमंत्री जनरल व्ही, के. सिंह यांच्या हस्ते झाले. या स्पर्धेचे खासियत ही आहे की, इतर खेळांना चांगला मंच मिळावा, तसेच देशातील तरुणांना फिटनेसचे महत्त्व कळावे हा प्रमुख उद्देश आहे. या स्पर्धेत मुला-मुलींना समान संधी देत, समान बक्षीस देण्यात येणार आहे.
पुणे : देशातील तरुणांना आरोग्याचे महत्त्व कळावे आणि इतर खेळांना एक चांगला मंच मिळावा, तसेच इतर खेळातील हुशार आणि चणाक्ष खेळाडूंना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी ‘पुश इंडिया पुश’ या स्पर्धेचे आयोजन केले आहे. देशातील इतर खेळांना याद्वारे निश्चित महत्त्व प्राप्त होणार आहे.
वडिलांच्या स्मरणार्थ आदर्श सोमानींचा उपक्रम :
आदर्श सोमानी यांनी या स्पर्धेला प्रोत्साहन देण्यासाठी या कार्यक्रमाला पाठिंबा दिला आहे. येथे उपस्थित मोठ्या कार्यक्रमात अनेक खेळाडू उपस्थित होते, जे नँशनल स्तरावर ज्यांनी उत्तम कामगिरी केली आहे. या कार्यक्रमाला अर्जुन पुरस्कार विजेते, तसेच राष्ट्रीय स्तरावरील अनेक खेळाडू होते. त्यांनी उत्तम कामगिरी करीत चांगली
केंद्रीय राज्यमंत्री व्ही. के. सिंह :
यावेळी केंद्रीय राज्यमंत्री व्ही. के. सिंह यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, पुश इंडिया पुश हा उपक्रम देशभर राबवण्यामागे महत्त्वाचे कारण म्हणजे आपल्या देशाचे दुर्भाग्य आहे की, आपली सर्व धनराशी एकाच खेळावर खर्च केली जाते, बाकीच्या खेळांना अजिबात महत्त्व दिले जात नाही. त्यामुळे आपले इतर खेळातील खेळाडू मागे पडतात. त्यामुळे आपले इतर खेळातील हुशार आणि चणाक्ष खेळाडू मागे पडतात. तसेच ग्रामीण भागातील इतर खेळाडू त्यांना चांगला प्लटफॉर्म न मिळाल्याने ते आपोआपच मागे पडतात.
इतर खेळातील खेळाडूंना चांगले मानधन मिळावे :
तसेच इतर खेळांना योग्य अनुदान न मिळाल्याने खेळाडू मागे तर पडतात त्याशिवाय त्यांचे पालकसुद्धा त्यांच्या खेळाला पाठिंबा दर्शवत नाही. त्यामुळे आम्ही या खेळाला चांगले अनुदान द्यायचे ठरवले आहे. हा उपक्रम आम्हाला नेहमीच चालू ठेवला आहे. तसेच, हा उपक्रम पूर्ण देशभर चालवायचा आहे.
बक्षिसांचे स्वरूप :
या स्पर्धेत प्रथम विजेता पुरस्काराला २५ लाख रुपये, तसेच त्यानंतर आलेल्या द्वितीय विजेत्याला १५ लाख, त्यानंतर आलेल्या विजेत्यांमध्ये त्यांच्या नियमानुसार बक्षीस मिळणार आहे. या स्पर्धेत २० विजेत्यांमध्ये १ करोडचे बक्षीस वाटले जाणार आहे. त्यानंतर असणाऱ्या १०० विजेत्यांमध्ये १४ लाख रुपये वाटले जाणार आहेत. या स्पर्धेत मोठी बक्षिसे वाटली जाणार आहेत. यांचे फिडीस्तान नावाचे ट्विट आहे, यामध्ये फिड भारतॉ नावाचे भारत सरकारचे ट्विटर अकाऊंट आहे.
रणजीत चामले यांनी केले सूत्रसंचालन :
या भव्य-दिव्य कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स.प. महाविद्यालयाचे क्रीडा संचालक रणजीत चामले यांनी केले. या कार्यक्रमाला राष्ट्रीय स्तरावर आपला ठसा उमटवणारे अनेक खेळाडू उपस्थित होते. अर्जुन पुरस्कार विजेते, नँशनल पुरस्कारप्राप्त अनेक खेळाडूंनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती.
मेजर डॉ. सुरेंद्र पुनिया यांनी व्यक्त केले मनोगत :
यावेळी माध्यमांशी बोलताना मेजर डॉ. सुरेंद्र पुनिया यांनी सांगितले की, आम्ही मँरेथॉन स्पर्धा भरवत असतो. या स्पर्धांमधून येणारी सर्व रक्कम आम्ही युद्धात अथवा सीमेवर जखमी झालेल्या जवानांवर खर्च करतो. भारतात मोठे खेळ खेळले जातात. परंतु, देशातील इतर खेळांना महत्त्व दिले जात नाही. या उपक्रमाने इतर खेळांना आम्ही प्रोत्साहन देणार आहे. त्यामुळे देशातील तरुण खेळाडूंना नक्कीच प्रोत्साहन मिळणार आहे.