अडचणीतील साखर कारखाने अडचणीतून बाहेर काढू : अजित पवार

नुकत्याच जाहीर झालेल्या पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणुकीच्या राष्ट्रवादी उमेदवारी संदर्भात मुलाखती घेण्यासाठी अजितदादा पवार व जयंत पाटील हे दोघे वरिष्ठ म्हणून आज पंढरपुरात दाखल झाले होते. एका मंगल कार्यालयात झालेल्या मेळाव्यात बोलताना ना. पवार म्हणाले की, राज्यातले काही साखर कारखाने सध्या अडचणीत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे ऊस उत्पादक देखील अडचणी येत आहेत. मात्र असे कारखाने अडचणीतून बाहेर काढण्याचे आम्हाला अनुभव आहेत

    पंढरपूर : पंढरपूर मंगळवेढा निवडणुकीच्या उमेदवारांची चाचणी करण्यासाठी पंढरपूर दौऱ्यावर आलेल्या उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी, राज्यातील काही साखर कारखाने अडचणीत आहेत, पण ते अडचणीतून बाहेर काढण्याचा अनुभव आम्हाला आहे बारामती तालुक्यातील सोमेश्वर कारखाना हे त्याचे ज्वलंत उदाहरण आहे, अशी स्पष्टोक्ती केली.

    नुकत्याच जाहीर झालेल्या पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणुकीच्या राष्ट्रवादी उमेदवारी संदर्भात मुलाखती घेण्यासाठी अजितदादा पवार व जयंत पाटील हे दोघे वरिष्ठ म्हणून आज पंढरपुरात दाखल झाले होते. एका मंगल कार्यालयात झालेल्या मेळाव्यात बोलताना ना. पवार म्हणाले की, राज्यातले काही साखर कारखाने सध्या अडचणीत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे ऊस उत्पादक देखील अडचणी येत आहेत. मात्र असे कारखाने अडचणीतून बाहेर काढण्याचे आम्हाला अनुभव आहेत. अनेकांनी खाजगी साखर कारखाने उभे केल्यामुळे सहकारी साखर कारखाने अडचणीत आले असल्याचे चित्र दिसत आहे. अशा परिस्थितीत सोलापूर जिल्ह्यातील एकाने आत्महत्या देखील केली होती. बारामती तालुक्यातील सोमेश्वर कारखाना कर्जाच्या खाईत सापडला होता. मात्र तो कारखाना संकटातून बाहेर काढला आहे. आज तो कारखाना राज्यातल्या पहिल्या पाच कारखान्यांपैकी एक आहे. सरकार मंत्री बाळासाहेब पाटील व जयंत पाटील यांना अशा कामाचा अनुभव आहे. त्यामुळे पुढच्या काळात अडचणीत असलेल्या कारखान्यांना पुन्हा वैभवाचे दिवस येतील, असे स्पष्ट केले. त्यामुळे शेतकरी व उत्पादकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

    पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील उमेदवारांचे नाव निश्चित करण्यापूर्वी चाचपणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार व जयंत पाटील हे पंढरपुरात आले होते. राष्ट्रवादीच्या मेळाव्यात गर्दी आणि गोंधळ वाढल्याने त्यांनी स्वतंत्र दालनांमध्ये संभाव्य उमेदवार यांना व त्यांच्या कार्यकर्त्यांना बोलावून भेटीगाठी घेतल्या व पुढील दिशा निश्चित केली आहे. यावेळी अजितदादा यांनी, राष्ट्रवादी कडून तुमच्या मनातलाच उमेदवार दिला जाईल, कोणतीही शंका बाळगू नका, अशी भुमिका स्पष्ट केली.