अंथुर्णेतील महादेव मंदिराला घरघर ;  बुरुंज, बारव आदी नामशेष होण्याच्या मार्गावर

अंथूर्णे : अंथूर्णे गावचे ग्रामदैवत असलेले पुरातन महादेवाचे मंदिर व मंदीर परिसरातील बांधकाम मोठ्या प्रमाणात जीर्ण झालेल असून, हेमाडपंथी दगडी शिळेच्या मंदिराचे अवशेष ढासळू लागले आहेत. पुरातन वारसा असलेली अनेक मंदिरे, हत्ती वाडा नावाने असलेले बुरुंज, भुयारी मार्ग असलेली बारव आदी नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. महादेवाचे मंदिर त्या पैकी एक. मागील काही वर्षात राज्याचे मंत्री दत्ताञय भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली अंथुर्णे भरणेवाडी येथील नागरिकांनी वर्गणीव्दारे एकाच शिळेवर गणपती व मारुतीच्या कोरीव मूर्ती असलेल्या मारुती मंदिराचे व विठ्ठल रुक्मीणी मंदिराचे दर्जेदार काम केले

अंथूर्णे : अंथूर्णे गावचे ग्रामदैवत असलेले पुरातन महादेवाचे मंदिर व मंदीर परिसरातील बांधकाम मोठ्या प्रमाणात जीर्ण झालेल असून, हेमाडपंथी दगडी शिळेच्या मंदिराचे अवशेष ढासळू लागले आहेत. पुरातन वारसा असलेली अनेक मंदिरे, हत्ती वाडा नावाने असलेले बुरुंज, भुयारी मार्ग असलेली बारव आदी नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. महादेवाचे मंदिर त्या पैकी एक. मागील काही वर्षात राज्याचे मंत्री दत्ताञय भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली अंथुर्णे भरणेवाडी येथील नागरिकांनी वर्गणीव्दारे एकाच शिळेवर गणपती व मारुतीच्या कोरीव मूर्ती असलेल्या मारुती मंदिराचे व विठ्ठल रुक्मीणी मंदिराचे दर्जेदार काम केले. याच दोन मंदिरांचत महादेवाचे मंदिर असून पुरातन कालीन मोठ मोठ्या दगडी शिळा तग धरुन आहेत.

झाडांच्या मुळांमुळे भिंतीस भेगा
मंदिराच्या कळसावर झाडे उगवली असून झाडांच्या मुळांमुळे भिंतीस मोठ्या भेगा पडून मुळं जमिनीत गेली आहेत. परिणामी दगडी बांधकाम ढासळले आहे. मंदिर परिसरात सौरऊर्जा प्रकल्प असून या ठिकाणी स्वच्छता केली जाते. परंतु मंदिराच्या ढासळणार्या भिंती मोठी भगदाडे खचले दगडी खांबांकडे अद्यापही कुणाचे लक्ष गेले नाही. पुरातन कालीन वारसा लाभलेले मंदिर पडण्यापासून वाचविले नाही तर मात्र मंदिराच्या अनेक भागांचे अस्तित्व संपुष्टात येऊन मंदीर अखेरच्या घटका मोजत आहे. मंदिराचे दर्जेदार काम केल्यास अंथुर्णे गावच्या वैभवात भर पडणार आहे. मंदिराच्या कामाकरीता निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी अंथुर्णे, भरणेवाडी परिसरातील नागरीकांनी केली आहे.