Fraud

आमच्या कंपनीत गुंतवणूक केल्यास जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून एकाची १० लाख २५ हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना एम्पायर इस्टेट, चिंचवड येथे घडली.

    पिंपरी : आमच्या कंपनीत गुंतवणूक केल्यास जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून एकाची १० लाख २५ हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना एम्पायर इस्टेट, चिंचवड येथे घडली.

    मार्स लाईफ मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे मालक दर्शन वर्मा आणि अमित कांतीलाल जैन अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. श्याम सादू गायकवाड (वय ५०, रा. बी. यू. भंडारी स्कायलाइन, दिघी) यांनी चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना १० फेब्रुवारी २०२० ते १० जानेवारी २०२२ या कालावधीमध्ये एम्पायर इस्टेट – चिंचवड येथे घडली.

    आरोपी दर्शन वर्मा याने त्याच्या मार्स लाईफ मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत गुंतवणूक केलेल्या पैशावर चांगला परतावा देतो, असे सांगितले. त्याने कंपनीच्या अ‍ॅक्सिस बँक या अकाऊंटवर फिर्यादी गायकवाड यांच्याकडून १२ लाख रुपये घेतले. त्यानंतर गायकवाड यांना १ लाख ७४ हजार रुपये परत देऊन त्यांची १० लाख २५ हजार रुपयांची फसवणूक केली.