गुळणी केल्याचा जाब विचारल्याने मारहाण करत हिसकावली दीड लाखाची सोनसाखळी

अंगावर गुळणी केल्याचा जाब विचारल्याने एकाला मारहाण करून त्याच्या गळ्यातील १ लाख ६० हजार रुपये किमतीची सोनसाखळी हिसकावून नेली. ही घटना पिंपरीतील साई चौकात घडली.

    पिंपरी : अंगावर गुळणी केल्याचा जाब विचारल्याने एकाला मारहाण करून त्याच्या गळ्यातील १ लाख ६० हजार रुपये किमतीची सोनसाखळी हिसकावून नेली. ही घटना पिंपरीतील साई चौकात घडली.

    चंदूराजा नथुराम आसवाणी (वय ५३, रा. पिंपळे-सौदागर) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी आसवाणी हे रविवारी (दि. ७) रात्री पावणेअकरा वाजता साई चौक – पिंपरी येथे जेवणाचे पार्सल आणण्यासाठी गेले होते. त्यावेळी एकाने त्यांच्या अंगावर गुळणा केला. याबाबत आसवाणी यांनी विचारणा केली असता आरोपीने स्टीलचा ग्लास त्यांना मारला.

    त्यानंतर आरोपीचे अन्य दोन ते तीन साथीदार तिथे आले. त्यांनी आसवाणी यांना पकडून त्यांच्या गळ्यातील १ लाख ६० हजार रुपये किमतीची सोनसाखळी हिसकावून नेली. याप्रकरणाचा पिंपरी पोलीस तपास करत आहेत.