एकमेकांना सांभाळत स्वतःचा स्वार्थ पूर्ण करण्यात गुंतले सरकार : पंकजा मुंडे

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींचे राजकिय आरक्षण रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला असून या पार्श्वभूमीवर राज्यव्यापी ओबीसी आरक्षण बचाव बैठक घेण्यात आली यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत पंकजा मुंडे यांनी पक्षाची भूमिका मांडली. यावेळी महापौर उषा ढोरे, शहराध्यक्ष व भोसरी विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश लांडगे, प्रभारी माधुरी मिसाळ, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे तसेच पदाधिकारी, नगरसेवक उपस्थित होते.

  पिंपरी : महाविकास आघाडी सरकार नवीन होते म्हणून त्यांना काम करण्यासाठी वेळ दिला. जनतेच्या मागण्या त्यांच्याकडून पूर्ण होतील अशी अपेक्षा होती. मात्र हे सरकार एकमेकांना सांभाळत स्वतःचा स्वार्थ पूर्ण करण्यात गुंतलेले आहे. त्यामुळेच महत्वाचे प्रश्न मार्गी लागत नसल्याचा आरोप भाजपाच्या नेत्या, राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी रविवारी पिंपरी येथे केला. महाविकास आघाडी सरकारने येणाऱ्या पिढ्यांचे जीवन अंधकारात घेऊन जाण्याचे काम केले आहे आहे असा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला. तर येत्या २६जून पासून राज्यात विविध ठिकाणी चक्काजाम आंदोलन करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला

  स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींचे राजकिय आरक्षण रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला असून या पार्श्वभूमीवर राज्यव्यापी ओबीसी आरक्षण बचाव बैठक घेण्यात आली यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत पंकजा मुंडे यांनी पक्षाची भूमिका मांडली. यावेळी महापौर उषा ढोरे, शहराध्यक्ष व भोसरी विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश लांडगे, प्रभारी माधुरी मिसाळ, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे तसेच पदाधिकारी, नगरसेवक उपस्थित होते.

  पंकजा मुंडे पुढे म्हणाल्या, आरक्षण रद्द झाल्यामुळे नागरिकांमध्ये सुप्त संताप सरकारविषयी निर्माण झाला आहे. सरकार नवीन होते म्हणून त्यांना कामासाठी वेळ दिला. मात्र त्यांनी या वेळेचा सदुपयोग केलेला नाही. केवळ एकमेकांना सांभाळून घेण्यात सर्व मंत्री आणि हे सरकार गुंतलेले आहे. त्यामुळे हे सरकार सर्व पातळ्यांवर अपयशी ठरलेले आहे. अभ्यासपूर्वक कोणतेही ठोस धोरण राबविण्यात येत नसल्यामुळे अनेक ठिकाणी सरकार अपयशी ठरल्याचे आपणास दिसत आहे.

  आघाडी सरकारच्या या कूचकामी कारभाराबद्दल नागरिकांच्या मनात असलेली चीड विरोधी पक्ष म्हणून आम्ही मांडणार आहोत.त्यामुळे सरकारचा निषेध म्हणून म्हणून येत्या २६जून रोजी छत्रपती शाहू महाराज यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनानंतर ही सरकारला जाग न आल्यास आमचा विरोध आणि न्यायाची ही लढाई आणखी तीव्र करण्यात येणार आहे.

  आजही आरक्षण सुरक्षित करता येऊ शकते मात्र सरकारची ती मानसिकता नाही. अनेक ठिकाणी नेते दिशाभूल करताना दिसत आहे. सरकारला शक्य असतानाही ओबीसींना आरक्षण देण्याविषयी जाणीवपूर्वक सरकारकडून चालढकल होत आहे .हेच मराठा आरक्षणाबाबत महाविकास आघाडीकडून होत असल्याचे दिसून आले आहे. असे सांगतानाच मुंडे पुढे म्हणाल्या अनेक मुद्दे घेऊन आम्ही सक्षम विरोधी पक्ष म्हणून यापुढे समोर येणार आहोत सुरुवात आरक्षण बचाव आंदोलनातून होणार आहेत

  भुजबळांना टोला

  महाविकास आघाडीचे मंत्री छगन भुजबळ यांनी ही ओबीसी आरक्षण बचाव भूमिकेला समर्थन दिले असून ओबीसी आरक्षण वाचविण्यासाठी आंदोलन करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.यावर पंकजा मुंडे यांनी भुजबळांना टोला लगावला.

  त्या म्हणाल्या “तुम्ही असं काही करू नका, तुम्ही सरकार मध्ये आहात. सत्तेत आहात. आंदोलन करण्यापेक्षा टास्क फोर्सची स्थापना करा.त्यांना आरक्षण वाचविण्यासाठी दिशा ठरवून द्या म्हणजे तातडीने हा प्रश्न मार्गी लागेल. मराठा आरक्षण देखील टिकवता येऊ शकेल. त्यासाठी ‘टाईम बाँड प्रोग्रॅम’ करावा लागेल असेही त्या म्हणाल्या. मराठा आरक्षणाचा मुद्दा सोडवण्यासाठी भाजप प्रत्येक ठिकाणी सक्षमपणे उभा असेल असेही त्यांनी सांगितले.