ओतूरमध्ये मतदार यादीत सावळा गोंधळ : मृतांची नावे समािवष्ट ; ग्रामपंचायत निवडणुकीत बाेगस मतदान हाेण्याची शंका

ओतूर : प्रत्येक मता-मताला अमूल्य महत्व असताना आणि एका मतावर प्रत्येक उमेदवाराचे भविष्य ठरत असताना तालुक्याचे लक्ष लागलेल्या ओतूरसारख्या महत्वपूर्ण गावच्या मतदार याद्यांमधील सावळा गोंधळ कायम आहे. अलाठ-दहा वर्षांपूर्वीच मयत झालेल्या मृत व्यक्तीची नावे मतदार यादीत आज असल्याचे समाेर आले आहे.

ओतूर : प्रत्येक मता-मताला अमूल्य महत्व असताना आणि एका मतावर प्रत्येक उमेदवाराचे भविष्य ठरत असताना तालुक्याचे लक्ष लागलेल्या ओतूरसारख्या महत्वपूर्ण गावच्या मतदार याद्यांमधील सावळा गोंधळ कायम आहे. आठ-दहा वर्षांपूर्वीच मयत झालेल्या मृत व्यक्तीची नावे मतदार यादीत आज असल्याचे समाेर आले आहे. लोकशाहीत पवित्र मतदानाला अनन्यसाधारण महत्व आहे. मात्र मतदार यादीतील गोंधळाचा ठपका कोणावर ठेवायचा? हा प्रश्नच आहे. मतदार मतदान करीत असताना आधारकार्ड सारखी अनेक कागदपत्रे पडताळून बघितली जातात. मगच मतदानाचा अधिकार दिला जातो. मतदार हयात असतानाही कधी कधी अडथळे येऊन मतदान करता येत नाही. मात्र मागच्या निवडणुकांमधून मृत व्यक्तीच्या नावे मतदान करण्याचा फंडा वापरल्याचा बोलबाला आहे.

-सुधारित याद्यांचा समावेश असावा
ओतूर ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु आहे. मात्र निवडणूक विभागाकडून मतदार याद्या जशाच्या तशा सादर झाल्या आहेत. इतकी वर्षे मयतांची नावे मतदार यादीत राहणे, ही एक अक्षम्य चूक असल्याचे मानले जात आहे. यामागची कारणे शोधणे क्रमप्राप्त असून खऱ्या मतदार याद्यांचा येत्या ग्रामपंचायत निवडणुकीत समावेश असावा, अशी मागणी होऊ लागली आहे.

-कुटुंबीयांनी व्यक्त केले आश्चर्य
मृत व्यक्तींच्या कुटुंबातील व्यक्तींची भेट घेतली असता त्या कुटुंबीयांनी अक्षरशः यावर आश्चर्यच व्यक्त केले. एव्हाना घरातील व्यक्ती मृत झाल्यावर वारस नोंदी अगर अन्य शासकीय प्रक्रिया पूर्ण करताना अनेक अडचणी येत असतात. रेशनिंग कार्डवर रेशनिंग देखील अगदी तत्काळ कमी केले जाते. मग एवढा मोठा सावळा गोंधळ कसा होऊ शकतो ? असा सवाल उपस्थित हाेत आहे. या गंभीर बाबींकडे प्रशासनाने लक्ष देऊन मतदार याद्यांमधील दुरुस्ती करण्याची आग्रही मागणी मतदारांमधून होऊ लागली आहे.

रेशन कार्ड व ७/१२ वर मृत व्यक्तींची नावे कमी झाली असली तरी मतदार यादीत कायम आहेत. मयत व्यक्तीच्या नावे बाेगस मतदान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वाॅर्ड क्र. १ च्या यादीत शेकडो लोक मयत झाल्याचे निदर्शनास येत आहे. इतर वाॅर्डमध्ये देखील यापेक्षा वेगळी परिस्थिती असणार नाही.

-सुनील तांबे, नागरिक, ओतूर