कर्जत पोलीसांकडून सुमारे  नव्व्द हजार रुपये किंमतीचा गुटखा जप्त

कर्जत : तालुक्यातील माहिजळगाव येथे पोलिसांनी छापा टाकून ८८०५१ रू चा गुटखा जप्त केला आहे.

कर्जत : तालुक्यातील माहिजळगाव येथे पोलिसांनी छापा टाकून ८८०५१ रू चा गुटखा जप्त केला आहे. पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दि २३ रोजी रात्री १० वा.चे सुमारास कर्जत पोलीसांनी माहिजळगाव येथील गुरुकृपा पान सेंटर मध्ये छापा टाकून , पान टपरीतून महाराष्ट्र शासनाची बंदी असलेला गुटखा एकुण ८८०५१ रुपये किंमतीचा जप्त केला आहे. याप्रकरणी गुटखा विक्रेता लक्ष्मण झुंबर भिसे , वय ३६ वर्षे , रा.माहिजळगाव , ता.कर्जत यास रंगेहाथ ताब्यात घेतले आहे. त्याच्याविरुध्द कर्जत पोलीस स्टेशन गु.र.नं ११६०/२०२० भा.द.वि.क १८८,२७२,२७३ सह अन्न सुरक्षा मानके अधि २६ प्रमाणे गुन्हा नोंद केला आहे . सदरची कारवाई अहमदनगरचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील , अपर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल , कर्जत पोलीस स्टेशनचे उपविभागीय पोलीस अधीकारी अण्णासाहेब जाधव व पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक सुरेश माने ,पोलीस उपनिरीक्षक अमरजित मोरे , पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ , पोलीस अंमलदार भाउसाहेब यमगर , गोवर्धन कदम , अमित बरडे , सुनिल खैरे यांनी केली असून सदर गुन्हयात पोलीस अंमलदार सुनिल खैरे यांचे फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोलीस अंमलदार प्रल्हाद लोखंडे हे करत आहेत .