माहेरहून पैसे आणण्यासाठी विवाहितेचा छळ; पतीसह सासूविरोधात गुन्हा दाखल

लोकांचे उसने घेतलेले पैसे देण्यासाठी विवाहितेने तिच्या आई-वडिलांकडून पैसे आणावेत, अशी मागणी पती आणि सासूने केली. विवाहितेच्या आई-वडिलांनी पैसे दिले नाहीत म्हणून आरोपींनी विवाहितेचा टोमणे मारून छळ केला.

    पिंपरी : लोकांचे उसने पैसे देण्यासाठी माहेरहून पैसे आणण्याची मागणी करत पती आणि सासूने विवाहितेचा छळ (Harassment of Married Woman) केला. ही घटना ऑगस्ट २०२० ते नोव्हेंबर २०२१ या कालावधीत दिघी येथे घडली. पती स्वप्नील रामचंद्र बांदल (वय ३२), सासू (वय ५८) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. २५ वर्षीय विवाहितेने दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

    लोकांचे उसने घेतलेले पैसे देण्यासाठी विवाहितेने तिच्या आई-वडिलांकडून पैसे आणावेत, अशी मागणी पती आणि सासूने केली. विवाहितेच्या आई-वडिलांनी पैसे दिले नाहीत म्हणून आरोपींनी विवाहितेचा टोमणे मारून छळ केला. तिला शिवीगाळ करत तिला स्वतःच्या खर्चासाठी लागणारे पैसे न देता सासरी नांदवण्यास आरोपींनी नकार दिला. दिघी पोलिस तपास करत आहेत.